‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, दीपिका पादुकोण 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दीपिका पार्वतीची भूमिका साकारणार आहे

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाबद्दल एक एक माहिती समोर येत होती. तसेच चित्रपटाचा ट्रेलर पाहून देखील प्रेक्षक खूप खूश झाले आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर शिवा आणि आलिया भट्ट ईशा ही भूमिका साकारणार आहेत. याचं दरम्यान, या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणची एन्ट्री होणार आहे.

दीपिका साकारणार पार्वतीची भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, दीपिका पादुकोण ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दीपिका पार्वतीची भूमिका साकारणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शिवा आणि ईशाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या पार्टमध्ये महादेव आणि पार्वतीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. यात महादेवाची मुख्य भूमिका रणबीरच साकराणार आहे की आणखी कोण हे असून समोर आलेलं नाही. मात्र, पार्वतीच्या भूमिकेत दीपिकाचं नाव फायनल सांगण्यात येत आहे.

ट्रेलरमध्ये सुद्धा दीपिका असल्याची बातमी 

जेव्हा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते, तेव्हा दीपिकाची झलक ट्रेलरमध्ये दिसत असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, जर ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या पार्टमध्ये जर दीपिकासोबत रणबीर कपूर एकत्र असतील. तर त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असेल. या दोघांनी याआधी ‘बचना है हसीनो’, ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.


हेही वाचा :‘या’ आठवड्यात बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित