Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनDeepika Padukone : नैराश्य लपवू नका, परीक्षा पे चर्चामध्ये दीपिकाने साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Deepika Padukone : नैराश्य लपवू नका, परीक्षा पे चर्चामध्ये दीपिकाने साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या 8व्या आवृत्तीची सुरुवात झाली आहे. ज्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सहभाग घेतला होता. यावेळी दीपिकाने बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्वतःच्या बालपणीचे अनेक गंमतीशीर किस्से सांगितले. आपण गणितात ‘ढ’ होतो, असेही तिने म्हटले. शिवाय मुलांच्या मेंटल हेल्थवर भाष्य करताना काही महत्वाच्या टिप्सदेखील दिल्या. या एपिसोडची एक झलक पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ हँडलवर शेअर केली आहे. (Deepika padukone interact with students in pariksha pe charcha 2025)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट

पीएम नरेंद्र मोदी यांच्या आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हँडलवर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या एपिसोडची झलक दिसते आहे.

या ट्विटमध्ये मोदींनी लिहिले, ‘या कार्यक्रमात मानसिक आरोग्य आणि कल्याण हे सर्वात महत्वाचे विषय आहेत. म्हणूनच, यावर्षी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम या विषयाला समर्पित असा एक विशेष भाग घेऊन आला आहे. जो 12 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. या भागात दीपिका पादुकोण तिचे विचार मांडेल’.

दीपिका पदुकोणचा विद्यार्थ्यांशी संवाद

या कार्यक्रमातील एका व्हिडिओ क्लिपमध्ये दीपिका विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतेय. ती म्हणतेय की, ‘मी सोफा, खुर्च्यांवर खूप उद्या मारायचे. लहानपणी मी खूप खोडकर होते. कधीकधी वेगवेगळ्या गोष्टींचा आपण खूप जास्त ताण घेतो. जसं की मी गणितात खूप कमकुवत होते. म्हणजे अजूनही आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

‘नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकात लिहिलंय की तुमच्या भावना कधीही दाबून ठेवू नका. तुमच्या मनात आहे ते बोला, मग ते तुमचे मित्र, कुटुंब, पालक किंवा शिक्षक कोणीही असो. याशिवाय तुमचे विचार डायरीत लिहून काढा. हादेखील स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा, स्वतः व्यक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे’.

..आणि मी बेशुद्ध पडले

यायला दीपिकाने आपल्या वर्कलाईफबद्दल बोलताना सांगितले, ‘एकेवेळी मी फक्त आणि फक्त काम करत होते. सलग काम करायची सवय लागली होती मला आणि एकदा मी बेशुद्ध पडले. काही दिवसांनी मला जाणवलं मी नैराश्याने ग्रासलेय. त्यामुळे नैराश्य लपवू नका. काहीही वाटत असेल तर मोकळेपणाने व्यक्त व्हा. मनावर ताण येऊन देऊ नका. आयुष्यात काय करायचे हे स्पष्ट असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. काही वाईट घडलं, मनासारखं झालं नाही तर हरकत नाही. कारण हे सर्वांसोबत घडते, म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

दीपिकाने पंतप्रधानांचे आभार मानले

दीपिकाने पुढे मोदींचे आभार मानले. ती म्हणाली, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानते. त्यांनी आम्हाला वरीयर्स (चिंता करणारे) म्हणून नव्हे तर एक्झाम वॉरियर्स म्हणून पुढे येण्यासाठी हे सुंदर असे व्यासपीठ दिले. यासोबत मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमची परीक्षा उत्तम द्याल’. माहितीनुसार, परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमात आणखी बरेच एपिसोड्स रिलीज केले जातील. ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

हेही पहा –

Chhaava Movie Advance Booking : छावा बॉक्स ऑफिस गाजवणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केला कोट्यवधींचा गल्ला