Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी सापडले ड्रग्ज, NCBकडून चौकशीसाठी समन्स

दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी सापडले ड्रग्ज, NCBकडून चौकशीसाठी समन्स

Related Story

- Advertisement -

सिनेअभिनेत्री दीपिका पादुकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाशला नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिकार्‍यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. बुधवारी तिची या अधिकार्‍यांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा एनसीबीने पर्दाफाश केला होता, याच गुन्ह्यांत दीपिकासह सारा अली खान, श्रद्धा कूपरसह इतरांची एनसीबीने चौकशी केली होती. यापूर्वीही दीपिकाची मॅनेजर करिश्माची चौकशी झाली होती, मात्र अलीकडेच चौकशीत काही नवीन खुलासे झाले आहेत, त्यामुळे करिश्माला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.

करिश्मा ही अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असून तिच्या घरातून पोलिसांनी दोन प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. याच संदर्भात तिची बुधवारी चौकशी होणार आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत एनसीबीच्या अधिकार्‍यांनी एका ड्रग्ज पेडलरला वांद्रे येथून अटक केली आहे, त्याच्याकडून पोलिसांनी गांजासह कोकेन आणि चरसचा साठा जप्त केला आहे. तो विदेशातून काही ड्रग्ज मागवित होता, त्याला ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन आहे, तसेच तो इतरांनाही ड्रग्ज देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – तैमूरची आई बाल्कनीत करतेय बेबी बंपसोबत फोटोशूट, व्हायरल झाले क्यूट फोटो


 

- Advertisement -