घरमनोरंजनभाईजानच्या 'या' वक्तव्यावर दीपिका नाराज

भाईजानच्या ‘या’ वक्तव्यावर दीपिका नाराज

Subscribe

दीपिका पादुकोण सध्या ही बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने काही वर्षांपूर्वी नैराश्यासह तिच्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलली होती. जगासमोर तिनं आपण नैराश्येच्या गर्तेत अडकले असल्याचे समोर आणलं होतं. यापूर्वी बॉलिवूडच्या क्वचितच एखाद्या अभिनेत्रीनं असं धाडस दाखवलं असेल. दीपिकाने नुकत्याच ‘वोग’ मासिकातील मुलाखतीत पुन्हा एकदा नैराश्यच्याबाबत बोलली आहे. त्यावेळी तिनं आपण सलमान खानच्या एका वक्तव्यामुळे नाराज असल्याचं सांगितलं.

दीपिकाने ‘वोग’ मासिकेत असं सांगितलं की, ‘नैराश्य हे माझ्यासाठी खडतर प्रवासासारखं आहे. क्षणाक्षणाला माझा जीव हा घुसमटत होता. मात्र नेहमीच लोक नैराश्य आणि दुःखी असण्यामध्ये काही तरी गल्लत करतात. नैराश्याची चैन मला परवडायची नाही असं एक अभिनेता म्हणाला होता. तो नैराश्याच्या गर्तेत अडकणं हा पर्याय असल्यासारखाचं सांगत होता,’ असं दीपिका मुलाखतीत म्हणाली आहे.

- Advertisement -

दीपिका ही सलमान खानच्या वक्तव्यावर इशार देतं असल्याचं दिसतं आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान यांने नैराश्याबद्दल आपलं मत मांडल होत. ‘बरेच लोक आजकाल सुट्टीवर जातात. ही सुट्ट्यांची चैन मला परवडणार नाही. तसेच अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत अडकत आहे पण ही देखील चैन मला परवडणार नाही, असं सलमान म्हणाला होता. यावरचं दीपिकानं वोग मासिकाच्या मुलाखतीत सलमान खानचं नाव न घेता नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

सध्या दीपिका ही पती रणवीर सिंगसोबत ‘८३’ या चित्रपटाचे चित्रिकरणं करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटात ती कपिल देवची पत्नी रोमी देव या भूमिकेतून दिसणार आहे. तसेच त्यानंतर दीपिका ‘छापाक’ या चित्रपटात अॅसिड अटॅकमध्ये वाचलेली लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेतून बघायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -