Oops मूमेंटमुळे दीपिका पदुकोण होतेय ट्रोल

deepika padukone oops moment suffers wardrobe malfunction mumbai airport
Oops मूमेंटमुळे दीपिका पदुकोण होतेय ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या लुक आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चाहत्यांनी नेहमीच आकर्षित करते. एथनिक ते अगदी वेस्टर्न वेअर दीपिका प्रत्येक आऊटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसते. अशात दीपिकाचा एक एअरपोर्टवरील लूक आता खूप चर्चेत आला आहे. दीपिकाचा हा अगदी कम्फर्टेबल आऊटफिट होता. मात्र या आऊटफिटमुळे दीपिकाला उप्स मूमेंटचा सामना करावा लागला.

दीपिका पदुकोणच्या या उप्स मूमेंटचा क्षण पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला आहे. दीपिका नेहमीप्रमाणेच स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकमध्ये मुंबई एअरपोर्टवर पोहोचली होती. यावेळी तिने अगदी प्लेन व्हाईट कलरचं टी-शर्ट, स्ट्राइप पॅन्ट आणि व्हाईट शूज परिधान केले होते. तसेच दीपिकाने डोळ्यावर ब्लॅक कलरचा गॉगल आणि हातात एक मोठी बॅग घेतली होती.

दीपिका एअरपोर्टवर तिच्या कारमधून खाली उतरली आणि पापाराझींनी तिला घेरले. यावेळी कॅमेरामन तिचे फोटो काढू लागले आणि व्हिडिओही बनवू लागले. दीपिकाच्या साईडने दिसणारा Oops Moment पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला. व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोणला पाहून असे दिसते आहे की, तिला याची जाणीवही झाली नाही. मात्र ट्रोल्सनी यावर बोलण्याची एकही संधी सोडली नाही.

व्हिडिओवर कमेंट करत काही युजर्सनी दीपिकाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘आतील सर्व काही दिसत आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘हिच्या चालणे आणि पोस्चरला काय झालं?’ याशिवाय अनेक चाहत्यांना दीपिकाचा हा लूक खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिका पदुकोण अखेरची ‘गहराईया’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा होते. चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत यांच्यात चित्रित केलेल्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. दीपिकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर दीपिका द इंटर्न, प्रभासचा फिल्म प्रोजेक्ट आणि शाहरुख खानचा पठाण या चित्रपटात दिसणार आहे.


लग्नानंतर रणबीर – अलियाचे पहिल्यांदाच आऊटिंगवर