‘नशे सी चढ़ गई’वर ‘दीप-वीर’चा रोमॅण्टिक अंदाज होतोय व्हायरल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोघंही डान्स करताना रोमॅण्टिक अंदाजात

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग या दोघांची कॅमेस्ट्री नेहमीच त्याच्या चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरत असते. या दोघांचे कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच धूमाकूळ घालत असतात. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पादुकोण बद्दल असणारे प्रेम व्यक्त करताना कधीच मागे-पुढे पाहत नाही. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोघंही डान्स करताना रोमॅण्टिक अंदाज दिसत आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणबीर सिंग हे ‘बेफिक्रे’ या चित्रपटातील ‘नशे सी चढ़ गई’ या गाण्यावर डान्स करताना एकत्र एन्जॉय करताना दिसताय. हा व्हिडिओ त्याच्या नावाने असणाऱ्या फॅनपेजवर पोस्ट केला असून चाहते या व्हायरल व्हिडिओला पसंती देताना दिसताय.

हा व्हिडिओ चित्रपट 83 च्या शुटिंग पुर्ण झाल्यानंतरचा आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा माजी भारतीय कप्तान कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दीपिका देखील या चित्रपटात दिसणार असून ती रणवीरच्या पत्नीची भूमिका करताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा लीक झाला बाथरूम व्हिडिओ!