घरमनोरंजनदीपिका पदुकोणच्या तब्येतीत सुधारणा, चित्रिकरणादरम्यान वाढले होते हृदयाचे ठोके

दीपिका पदुकोणच्या तब्येतीत सुधारणा, चित्रिकरणादरम्यान वाढले होते हृदयाचे ठोके

Subscribe

प्रोजेक्ट के चित्रपटाचं शुटींग सुरू असताना तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, तिच्यावर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Bollywood Actress Deepika Padukon) हिची तब्येत बिघडल्याने तिला हैदराबाद येथील कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रोजेक्ट के चित्रपटाचं शुटींग सुरू असताना तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, तिच्यावर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Deepika Padukone rushed to a hospital in Hyderabad after increased heart rate; actress returns to sets after treatment)

हेही वाचा – ‘फायटर’ चित्रपटासाठी ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण घेणार मार्शल आर्टचे ट्रेनिंग

- Advertisement -

अभिनेता प्रभाससोबत दीपिका पदुकोण पहिल्यांदाच काम करणार आहे. प्रोजेक्ट केमध्ये ते दोघे एकत्र असून अमिताभ बच्चनसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असतानाच दीपिका पदुकोणच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तिला हैदराबादच्या कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार झाल्यानंतर तिची तब्येत पूर्ववत झाली. त्यामुळे ती पुन्हा सेटवर परतली असून तिने अमिताभ बच्चनसोबतचे सीन पूर्ण केले, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा दीपिकाला कॉपी केल्याने आलिया झाली Troll…

- Advertisement -

नाग अश्विन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचं चित्रिकरण हैदराबाद येथे सुरू आहे. यामध्ये दीपिका, अमिताभ यांच्यासोबत दिशा पटानीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

हेही वाचा – दीपिका देणार गूड न्यूज, होणाऱ्या बाळाबद्दल रणवीर म्हणाला….

दरम्यान, दीपिका पदुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती, याचा खुलासा तिने २०१५ मध्ये केला होता. यासाठी ती मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होती. एका मुलाखतीत तिने म्हटलं होतं की, नैराश्य हा आजार अत्यंत वाईट अनुभव देणारा होता. मात्र, ती या आजाराला लपवू शकली नाही. त्यामुळे तिने व्यवस्थित उपचार घेऊन या आजारावर मात केली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -