घरताज्या घडामोडीदीपिका पदुकोण रणवीरसह मुंबईत परतली; शनिवारी NCB कडून होणार चौकशी

दीपिका पदुकोण रणवीरसह मुंबईत परतली; शनिवारी NCB कडून होणार चौकशी

Subscribe

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आल्यानंतर सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोण हिने शनिवारी आपण चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे एनसीबी अधिकार्‍यांना कळविले आहे. त्यामुळे दीपिकाची आता शनिवारी चौकशी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी राहुल प्रित सिंग आणि करीश्मा प्रकाश यांची एनसीबीकडून चौकशी होणार आहे. तसेच एनसीबी विनंती अर्ज मान्य करुन लोकल कोर्टाने शौविक चक्रवर्ती आणि दिपेश सावंत यांची जबानी नोंदविण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान गुरुवारी सिमोन खंबाटा अणि श्रुती मोदी यांची पुन्हा चौकशी करुन त्यांची जबानी नोंदविण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी दीपिकाला शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते, मात्र दीपिका ही गोवा येथे असून तिने शनिवारी आपण चौकशीसाठी हजर राहू असे सांगितले होते, त्यामुळे शुक्रवारऐवजी तिला शनिवारी हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गुरुवारी फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि श्रुती मोदी यांची एनसीबीने कसून चौकशी केली. ते देाघेही सकाळी कुलाबा येथील एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये आल्या होत्या. सिमोनची दुपारपर्यंत तर श्रुतीची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांना सोडून देण्यात आले. या दोघांसह सनम जोहर आणि अबीगेल पांडे यांचीही गुरुवारी एनसीबीने चौकशी केली होती. सलग दुसर्‍या दिवशी ही चौकशी झाली. त्यांना गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दुसरीकडे करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊस मॅनेजरला शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले. दुसरीकडे शौविक चक्रवर्ती आणि दिपेश सावंत यांची जबानी नोंदविण्यासाठी एनसीबीने लोकल कोर्टात विनंती अर्ज केला होता. हा अर्ज कोर्टाने मान्य करुन या दोघांची जबानी नोंदविण्यास परवानगी दिली. सध्या ते दोघेही तळोजा कारागृहात आहेत. लवकरच त्यांचा ताबा घेऊन त्यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे.

- Advertisement -

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह मुंबईत परतले

दीपिका पदुकोन गोव्यातून मुंबईत परतली; शनिवारी NCB समोर चौकशी होणार

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, September 24, 2020

 

- Advertisement -

दीपिका पदुकोणच्या प्रभादेवी येथील घरी पोलीस बंदोबस्त

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोणला NCB ने नोटीस बजाविल्यानंतर तिच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास सुरु असताना बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा एनसीबीने पर्दाफाश केला होता. दीपिका ही सध्या तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहसोबत प्रभादेवी येथे राहते. अलीकडेच दिपीकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता दीपिका चौकशीसाठी हजर राहणार असल्याने तिच्या घरासमोर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -