घरमनोरंजन'सिंघम अगेन' चित्रपटात दीपिका पादुकोण साकारणार 'लेडी सिंघम'ची भूमिका

‘सिंघम अगेन’ चित्रपटात दीपिका पादुकोण साकारणार ‘लेडी सिंघम’ची भूमिका

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या अभिनयाची छाप फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील उमटवली आहे. सध्या दीपिकाचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. आगामी काळात दीपिकाचे बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सध्या दीपिका त्याच चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता दीपिकाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. लव्ह स्टोरी आणि रोमाँटिक चित्रपट तयार करणारी दीपिका आता लवकरच अॅक्शन देखील करताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण लवकरच प्रसिद्घ चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटामध्ये दीपिका लेडी सिंघमची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सिंघम फ्रेंचायजीच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

- Advertisement -

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ची घोषणा केली होती. या वेळी अजय देवगणचा एक फोटो शेअर करुन खाली ‘सिंघम अगेन’ असं लिहिलं होतं. दरम्यान, आता या चित्रपटामध्ये दीपिका देखील असणार आहे. अजय देवगण आणि दीपिका पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.रोहित शेट्टी आणि अजय देवगणने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सिंघम’, ‘सिंघम 2’, आणि ‘गोलमाल’च्या फ्रेंचायजीच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

- Advertisement -

‘सर्कस’ आणि ‘पठाण’मध्ये दिसणार दीपिका
रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील करंट लगा रे या गाण्यामध्ये दीपिका देखील दिसेल. या व्यतिरिक्त दीपिका शाहरुखसोबत ‘पठाण’ चित्रपटामध्ये दिसेल.

 


हेही वाचा :

राजकुमारच्या विगमुळे मला खूप त्रास झाला… शर्मिला टागोर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -