दीपिका पादुकोणची 95व्या ऑस्करमध्ये होणार एन्ट्री; पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘पठाण’ चित्रपट आणि त्यातील गाण्यांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसकर करोडोंची कमाई करत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले. जगभरातील प्रेक्षकांना या चित्रपटाची भुरळ पडली आहे. दरम्यान, अशातच दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरुन 95 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये ती प्रस्तुतकर्ता म्हणून दिसणार असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी कळल्यापासून दीपिकाचे चाहते खूप खूश होऊन तिला अनेक शुभेच्छा देत आहेत.

याआधी यंदाच्या ऑस्करमध्ये RRR चित्रपटातील गाणं गेल्याने भारतीय आनंदी होते. अशातच आता दीपिका देखील ऑस्करमध्ये दिसणार असल्याचं कळताच चाहेत खूप खूश झाले आहेत.

दीपिकाची पोस्ट चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा आता फक्त भारतापुरतीच मर्यादीत नसून ती जगभरात आहे. अनेक मोठ्या इंटरनॅशनल ब्रँड्सची अॅम्बेसेडर असण्यासोबतच दीपिकाने अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली आहे. अशातच आता ऑस्करसारख्या आणखी एका मोठ्या कार्यक्रमाची भर त्यात पडली आहे. आता दीपिका ऑस्कर 2023 मध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून दिसणार आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या यादीत दीपिकासोबत जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

या चित्रपटात दिसणार दीपिका

दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यातील दीपिकाचा अभिनय आणि नृत्य साऱ्याचच प्रेक्षकांनी कौतुक केलं. आगामी काळात दीपिका प्रभास सोबत ‘प्रोजेक्ट के’ तर ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ आणि अमिताभ यांच्यासोबत देखील एका चित्रपटात दिसेल. शिवाय दीपिका हॉलिवूड चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.


हेही वाचा :

मध्यरात्री दोन तरुणांनी केला शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केलं गजाआड