घरट्रेंडिंगदीपिकाची साडी सब्यसाचीने डिजाइन केली नव्हती?

दीपिकाची साडी सब्यसाचीने डिजाइन केली नव्हती?

Subscribe

दीपिका पदुकोणने तिच्या लग्नामध्ये नेसलेली साडी सब्यसाची मुखर्जीची नसून अंगदी गॅलेरिया नावाच्या एका स्थानिक शॉपमधून घेतल्याचं स्वत: सब्यसाचीने मान्य केलं आहे. यासाठी त्याने एक इन्साग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे.

बॉलीवूडचे कोणतेही लग्न कार्य असो एक नाव मनात येते ते म्हणजे सब्यसाची मुखर्जीचे. नुकतेच पार पडलेले दीपिका-रणवीरचे लग्न आणि गेल्यावर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नात एक साम्य होते. ते म्हणजे दोन्हीही जोडपी डोक्यापासून ते पायापर्यंत सब्यसाचीने डिजाइन केलेल्या कपड्यांनी नटलेले होते. पण आता एक वेगळेच चित्र समोर आले आहे.

कोंकणी विवाह सोहळ्याच्या वेळी दीपिकाची साडी सब्यसाचीने डिजाइन केली नसून, ती बंगळुरुच्या एका दुकानातून विकत घेतली होती. कोंकणी पद्धतीमध्ये आईने दिलेली साडी नवरी नेसते. त्यामुळे दीपिकाची आई उज्जाला पदुकोन हिने बंगळुरुच्या दुकानातून साडी घेतली. ती मग सब्यसाचीला दिली. त्याने मग साडीला पदर लावला आणि अलंकार सुचवले. हीच साडी दीपिकाने नेसली होती.

- Advertisement -

पाहा – दीपवीरचा वेडिंग अल्बम!

इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सब्यसाचीने याबाबतचा सविस्तर खुलासा केला आहे. शिवाय त्या पोस्टमधून सब्यसाचीने त्यांना पूर्ण श्रेय देखील दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Thank you Shefalee Vasudev @shefatwork @thevofashion for aligning the information. #Sabyasachi #TheWorldOfSabyasachi

A post shared by Sabyasachi Mukherjee (@sabyasachiofficial) on

- Advertisement -


अंगदी गॅलेरियाने देखील सब्यसाचीच्या या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. लोकांना खरी माहिती दिल्याबद्दल त्याचे आभार देखील मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


सब्यसाचीने दीपवीर आणि विरुष्काचे लग्नाचे सर्व फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
दीपिका आणि रणवीर आता बंगळुरूमध्ये त्यांच्या रिसेप्शनसाठी आहेत. त्यांचा विवाह सोहळा १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी इटलीत पार पडला. येत्या २८ तारखेली मुंबईला सर्व बॉलीवूड मंडळींसाठी दुसरे रिसेप्शन होणार आहे.

वाचा – दीपवीरचं बंगळुरूमधलं रिसेप्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -