आजच्या जोडप्यांमध्ये संयम… दीपिकाने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिका पादुकोणने सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य सांगितले आहे. तिने सांगितले की, नातेसंबंधात संयमाची सर्वात जास्त गरज असते आणि आपण आपल्या जुन्या पिढीकडून शिकले पाहिजे. दीपिका पादुकोणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक अनेक कमेंट्स देखील करत आहेत.

दीपिका पादुकोणचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by TIME (@time)

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी आपले मत मांडताना सांगितले की, लग्न किंवा नातेसंबंधांबाबत चित्रपटांमुळे आपण प्रभावित होतो. ती म्हणाली की, “मला वाटते की आपण सर्वजण चित्रपटांच्या प्रभावाने मोठे झालो आहोत एकत्र चालणे हे एकमेकांच्या प्रवासापेक्षा खूप वेगळे असू शकते. तुम्ही हे जितक्या लवकर स्वीकारले तितके चांगले.”

पुढे दीपिका म्हणाली की, “मला वाटते फक्त माझे आई-वडीलच नाही तर संपूर्ण पिढी, आजच्या जोडप्यांमध्ये संयम ही एक मुख्य गोष्ट आहे ज्याची कमतरता आहे. फक्त मी आणि रणवीरनेच आपल्या पालकांकडून ही गोष्ट शिकावी असं नाही तर आमच्यासारख्या सर्व जोडप्यांनी ही गोष्ट आपल्या आधीच्या पिढीकडून शिकायला हवी.” असं दीपिका म्हणाली.

दरम्यान, दीपिका पादुकोण शेवटची ‘पठाण’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाची शाहरुखसोबतच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता दीपिका ‘फाइटर’ आणि ‘प्रोजेक्ट के’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.

 


हेही वाचा :

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचं पॅच अप? ‘या’ फोटोमुळे चर्चेला उधाण