घरमनोरंजनदीपिकाने रणवीरला मारली चापट; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

दीपिकाने रणवीरला मारली चापट; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

बॉलिवूडमधील पॉवर कपल अशी ओळख असलेले दीपिका आणि रणवीरच्या जोडीचे करोडो चाहते आहेत. दोघेही आपल्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. मागील काही दिवसांपूर्वी दोघांच्या नात्यामध्ये काही ठिक चालत नसल्याच्या अफवा समोर येत होत्या. मात्र, रणवीर आणि दीपिकाने या अफवांना उत्तर दिलं नाही. दरम्यान, नुकताच दोघांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दोघेही एकमेकांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत.

एक-दोन दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये तो आणि दीपिका एकमेकांसोबत खास क्षण घालवताना दिसत आहेत. सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

दीपिकाने रणवीरला मारली चापट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveersingh (@ranveersinghsfanclub)

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला रणवीर दीपिकाला चिडवत आहे. तेव्हा दीपिका हसत-हसत त्याला प्रेमाने चापट मारते. या व्हिडीओ पाहून रणवीर-दीपिकाचे चाहते खूश झाले आहेत. तसेच या व्हिडीओखाली चाहते अनेक कमेंट्स देखीस करत आहेत.

- Advertisement -

‘पठाण’मध्ये दिसणार दीपिका
दीपिका पादुकोण लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये दीपिका स्टाईलिश अंदाजात दिसली. 25 जानेवारी 2023 मध्ये या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाव्यतरिक्त रणवीर-दीपिका आगामी काळात ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये देखील दिसणार आहेत.


हेही वाचा :

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केलीय तुरुंगवारी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -