घरमनोरंजन'सिम्बा' प्रदर्शित झाल्यावर दीपिका जाणार हनिमूनला!

‘सिम्बा’ प्रदर्शित झाल्यावर दीपिका जाणार हनिमूनला!

Subscribe

आम्ही सध्या तरी आमच्या करिअरकडे पुर्णपणे लक्ष केंद्रित करत असून 'स्मिबा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही हनिमून आणि फॅमिली प्लॅनिंगविषया विचार करणार आहोत, असे दीपिका म्हणाली आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा दोघांचा विवाहसोहळा नुकताच काही दिवसांपूर्वी संपन्न झाला. त्यांचा हा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला. त्यानंतर मुंबईमध्ये लग्नाचे रिसेप्शन झाले. या सर्व घडामोडीनंतर आता दीपिका आणि रणवील हे नक्की कुठे आहेत आणि आता पुढे ते चित्रपटात कसे काम करतील, असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांना सतावित आहेत. अशाच एका प्रश्नाचे उत्तर दीपिकाने दिले आहे. एका मुलाखतीत दीपिकाला एक प्रश्न विचारण्यात आला की, तू आता ऑनस्क्रीन किसिंग देणार का? यावर दीपिकाने ‘शी…’ अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर आम्ही सध्या करिअरकडे लक्ष केंद्रित केल असून रणवीरचा ‘सिम्बा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हनिमूनला जाणार असल्याची माहिती दीपिकाने दिली आहे.

नेमका काय होता प्रश्न?

एका मुलाखतीत दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला की, दीपिका आता तूझा रणवीरसोबत विवाह झाला आहे. त्यामुळे चित्रपटांची निवड करताना किंवा एकाद्या चित्रपटामध्ये तू ऑनस्क्रीन किसिंग सीन देणार का? त्याचबरोबर आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनस्क्रीन ने किसिंग क्लॉज असं नमूद करणार का? यावर दीपिकाने लगेच ‘शी…’ अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

‘सिम्बा’ नंतर हनिमून

सध्या रणवीर ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. शिवाय, दीपिकाही गुलजार यांच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. त्यामुळे आम्ही सध्यातरी आमच्या करिअरवर पुर्णपणे लक्ष केंद्रित करत आहोत, असे दीपिकाने सांगितले आहे. दीपिका ‘निकलोडियन किड्स चॉइस अवॉर्ड २०१८’ या कार्यक्रमात आली होती. त्यावेळी ती माध्यमांशी बोलताना म्हणाली की, आम्ही सध्या तरी आमच्या करिअरकडे पुर्णपणे लक्ष केंद्रित करत असून ‘स्मिबा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही हनिमून आणि फॅमिली प्लॅनिंगविषया विचार करणार आहोत.


हेही वाचा – ‘मुझे भाभी मत कहना’ ; सांगतेय दीपिका पदुकोण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -