कब आएंगे फोटो? विनोदी Memes ने दीप-वीर ट्रोल

दीप-वीरच्या लग्नातील एखादा सुंदर फोटो समोर येईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, याबतीत चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

‘दीप-वीर’ अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघं नुकतेच लग्नबंधनात अडकले. बुधवारी १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आज १५ तारखेला त्यांनी सिंधी पद्धतीने पुन्हा एकदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ज्या विवाहसोहळ्याकडे तमाम देशवासीयांचं आणि संपूर्ण बॉलीवूडचं लक्ष लागून राहिलं होतं, त्या लग्नातील रणवीर-दीपिकाचा एकही फोटो समोर न आल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहे. दीपिका आणि रणवीरने त्यांचा लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी एका खास सिक्युरिटी एजन्सीला हायर केलं आहे. इतकंच नाही तर लग्नात सहभागी होणाऱ्या लोकांच्या मोबईल कॅमेरांवर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजतंय. याशिवाय त्यांनी ड्रोन शूटवरही बंदी घातली आहे. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणेच दीप-वीरचाही लग्नातील एखादा सुंदर फोटो समोर येईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. तसं पाहिलं तर त्यांच्या लग्न स्थळाचे तसंच लग्नासाठी पोहोचलेल्या कुटुंबियांचे काही फोटो समोर आले आहेत.

मात्र, दीपिका आणि रणवीरची एकही झलक पाहायला न मिळाल्यामुळे दोघांचेही चाहते चांगलेच नाराज झाले आहे. त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावरुन जाहीरपणे व्यक्त केली आहे. दीप-वीरच्या लग्नातील त्यांचे फोटो कधी समोर येणार??? असा प्रश्न उपस्थित करणारे काही विनोदी Memes नेटिझन्सनी तयार केले आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीर चांगलेच ट्रोल झाले आहेत. सोशल मीडियावर हे Memes तुफान व्हायरल होत आहेत. पाहुया, अशाच काही धमाल Memes ची झलक :

लग्नाचे फोटो कधी येणार? वाट पाहतोय…

 

 


 वाचा: स्मृती इराणीलाही दीपवीरच्या लग्नाच्या फोटोची उत्सुकता
वाचा: देसी गर्ल प्रियांका करणार ‘ख्रिश्चन’ वेडिंग?