दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा कोंकणी पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला असून प्रत्येक जण दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यास उत्सुक आहेत. वधूच्या पोशाखातील दीपिका आणि वराच्या पोशाखातील रणवीर पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने अद्याप इटलीतील या विवाह सोहळ्याचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही. लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवण्यात आली आहे. अन्य कुणाच्याही हाती लग्नाचा एकही फोटो पडणार नाही, यासाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.
वाचा : रिस्ट बँड, QR कोड; दीपिका-रणवीरच्या लग्नात सिक्युरिटी टाइट
तगडी सुरक्षा व्यवस्था
मोबाईलचा कॅमेरा स्टिकर्सनी झाकण्यापासून तर ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येकाला विशिष्ट कोड असलेला ई-पासही देण्यात आला आहे. येथील सुरक्षा व्यवस्था तगडी असल्याने दीपवीरच्या लग्नाचा एकही फोटो लीक होणे कठीण आहे. पण यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण स्वत: दीपवीर आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणार आहेत.
वाचा : दीपिका परिधान करणार १ कोटीचे दागिने
स्वत:च निवडलेले फोटो शेअर करणार
काही खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर स्वत: आपल्या या अतिशय खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितात. प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेला आणि स्वत: निवडलेलाचं फोटो सोशल मीडियावर टाकला जाईल, यासाठी त्यांनी इतका कडेकोट बंदोबस्त केला आहे. आपल्याशिवाय अन्य कुणीही आपल्या लग्नाचा फोटो शेअर करू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या फोटोची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना करावी लागणार आहे.
वाचा : दीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला