सुशांतच्या वडीलांची चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

delhi high court dismisses late actor sushant singh rajput fathers petition against the proposed movies being made about the actor life
सुशांतच्या वडिलांची चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेची काळी बाजू सर्वांच्या समोर आली. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण,नेपोटीझम, एखाद्या कलाकाराची बदनामी कशी केली जाते. आणि इतर काही गोष्टी लोकांसमोर उघड झाल्या. सुशांतच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. अनेक घडामोडी सुशांत गेल्याने उघडकीस आल्या. यानंतर सुशांतच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’, ‘सुसाइड ऑर मर्डर : ए स्टार वाज लॉस्ट’ या बायोपिक सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमा विरोधात सुशांतच्या वडीलांनी कोर्टात धाव घेतली होती. आता दिल्ली हायकोर्टाने सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेली याचिका रद्द केली आहे. या याचिकेत सिनेमा बनवण्यास रोख लावण्यात आली होती. सुशांतच्या वडीलांच्या मते त्यांच्या मुलाच्या नावाचा वापर करून सिनेमा बनवण्यात येत असलायचे आरोप लावण्यात आले होते. यामुळे सिनेमा तयार होऊ नये म्हणून त्यांनी केस दाखल केली होती.

सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 साली मुंबईमधील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. यानंतर सर्व स्तरावर एकच खळबळ उडाली होती. राजकीय क्षेत्रावरही याचे विपरीत पडसाद उमटले होते. तसेच सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडीलांनी अभिनेत्री रिया चक्रवातीवर सुशांतच्या आत्महत्यास जबदार आहे असे गंभीर आरोप लावत तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती


हे हि वाचा – Khatron Ke Khiladi 11मधून थेट पाच खिलाडी बाहेर!