कुंज बिहारी, क्या बात थी तुम्हारी… सतीश कौशिक यांना दिल्ली पोलिसांची अनोखी श्रद्धांजली

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी(8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला होता. गुरुवारी (9 मार्च) संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांचे नातेवाईक तसेच अनेक बॉलिवूड कलाकारा उपस्थित होते. अनेकांनी सतीश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अशातच दिल्ली पोलिसांनी देखील त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिल्ली पोलिसांची स्पेशल पोस्ट चर्चेत

सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शेअर केलेली दिल्ली पोलिसांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यांनी लिहिलंय की, कुंज बिहारी, क्या बात थी तुम्हारी… तुम्ही नेहमीच आमच्या कॅलेंडरमध्ये पेजर बनून स्मरणात रहाल. रेस्ट इन पीस सतिश कौशिकजी.” शिवाय त्यांच्या एका फोटोवर “सुनिए तो सही, थोडा रुकीये तो सही…” असं लिहित फोटो शेअर केला आहे.

सतिश कौशिक मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास सुरु

दिल्ली पोलिसांनी सतिश कौशिक यांच्या मृत्यूमागे कोणाचा हात तर नाही ना याचाही तपास करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पूर्ण दिवसात सतिश कौशिक यांच्यासोबत काय काय घडलं याची माहिती सध्या पोलिस मिळवत आहेत.
सतिश कौशिक यांच्या मॅनेजरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत समोर आलं आहे की, ते बुधवारी रात्री 10:30 वाजता झोपायला निघून गेले होते. रात्री 12 नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली.तेव्हा मॅनेजरला बोलावण्यात आलं होतं.

 


हेही वाचा :

सतीश कौशिक यांच्या 12 वर्षीय मुलीने शेअर केला वडिलांसोबतचा फोटो; नेटकरी झाले भावूक