दिल्लीच्या प्रदूषणाने प्रियांका – फरहान हैराण

दिल्लीतील प्रदूषण वाढतच चालले आहे. सध्या आपल्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटासाठी फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा दिल्लीमध्ये आहेत. त्यांनाही या प्रदूषणाचा त्रास झाला आहे.

Farhan and Priyanka
प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या निक जोन्सबरोबर होणाऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. मात्र ती सध्या व्यग्र आहे ते म्हणजे फरहान अख्तरसह ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये. प्रियांका पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये परत येत असून ती फरहान अख्तरच्या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान फरहानने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे जो सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. सध्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे दोघेही दिल्लीमध्ये आहेत. या फोटोमध्ये फरहान आणि प्रियांका दोघांनीही मास्क घातला आहे. पण नक्की का? असा प्रश्न साहजिक आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की, दिल्लीतील प्रदूषणामुळे फरहान आणि प्रियांका दोघेही हैराण झाले आहेत. हा फोटो पोस्ट करत ‘दिल्लीतील हवेला मास्क (झाकोळले) केले आहे’ असे कॅप्शन दिले आहे. दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आहे. दिल्लीतील हवा अतिशय खराब झाल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे आता याचा त्रास सामान्य माणसांना कसा होत असेल हेदेखील समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

Masking our emotions in the Delhi air. @priyankachopra your pose is just ✅ #bts #prescenereading #theskyispink

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

झायरा वसिमचीही महत्त्वाची भूमिका

‘द स्काय इज पिंक’ चित्रपटामध्ये प्रियांका आणि फरहानच्या मुख्य भूमिका असून यामध्ये झायरा वसिमचीही मुख्य भूमिका आहे. झायराच्या आई – वडिलांची भूमिका हे दोघे जण साकारणार असल्याची सध्या माहिती मिळत आहे. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस करत असून बरेच वेळा सेटवरील फोटोही व्हायरल होताना दिसतात. तर या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतरच आता प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये २ डिसेंबरला विवाहबद्ध होत असल्याच्या बातम्यांनाही सध्या उधाण आलेलं आहे. निक आणि प्रियांका लग्नाआधी आपल्या सर्व बॅचलर पार्टीचा आनंद घेतानाही दिसत आहेत.