घरताज्या घडामोडी'पुष्पा'च्या भरघोस यशानंतर 'Allu Arjun'ला डिमांड ; एटलीच्या सिनेमासाठी 100 कोटींची ऑफर

‘पुष्पा’च्या भरघोस यशानंतर ‘Allu Arjun’ला डिमांड ; एटलीच्या सिनेमासाठी 100 कोटींची ऑफर

Subscribe

'पुष्पा द राइज' या सिनेमाच्या भरघोस यशानंतर अल्लू अर्जुनली फुल डिमांड आली आहे. या सिनेमानंतर अल्लू अर्जुनच्या नशिबी मोठी चित्रपटांची ऑफर येत आहे. याशिवाय त्यांना या सिनेमासाठी मोठ्या रकमेची ऑफर येत आहे. या सर्वाचे श्रेय दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने केलेल्या अभिनयाला जाते. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे.

‘पुष्पा द राइज’ या सिनेमाच्या भरघोस यशानंतर अल्लू अर्जुनली फुल डिमांड आली आहे. या सिनेमानंतर अल्लू अर्जुनच्या नशिबी मोठी चित्रपटांची ऑफर येत आहे. याशिवाय त्यांना या सिनेमासाठी मोठ्या रकमेची ऑफर येत आहे. या सर्वाचे श्रेय दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने केलेल्या अभिनयाला जाते. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणीही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीस येऊन त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ‘पुष्पा’ या सिनेमाच्या भरघोस कमाईनंतर कलाकारांचे आयुष्य उजळले आहे. पुष्पामधील अल्लू अर्जुनचा अभिनय चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरला आहे.

अल्लू अर्जुनच्या या लोकप्रियतेमुळे अनेक फिल्म मेकर्सनी त्याला मोठ्या चित्रपटांचे ऑफर दिल्या आहेत. एका वृत्ताच्या माहितीनुसार, लायका प्रोडक्शनने त्यांच्या पुढील प्रोजेक्टसाठी अल्लू अर्जुनला ऑफर केले आहे. यासाठी अल्लू अर्जुनला 100 कोटींची ऑफर दिली आहे. या लायका प्रोडक्शनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन एटली करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

- Advertisement -

अल्लू अर्जुन एक कुशल अभिनेता आहे तर एटली हा परफेक्ट दिग्दर्शक आहे. एटली थेरी,मार्सल आणि बिजिली हे ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अल्लू अर्जुन आणि एटलीचे कॉम्बिनेशन बऱ्याच प्रमाणात खास असणार आहे. अल्लू अर्जुनची वाढती लोकप्रियता पाहता येणाऱ्या दिवसात आपल्या चित्रपटामधून मोठ्या प्रमाणात यश मिळवणार आहे. पुष्पा या सिनेमातील अल्लू अर्जुनचे अनेक डायलॉग आणि गाणी चाहत्यांना पसंत पडली असून, सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – Rachel Shelley : ‘लगान’मधली गोरी मॅम आहे एवरग्रीन, आजही दिसते जशीच्या तशी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -