घरमनोरंजनसोशल मीडियावर गायक जुबिन नौटियालला अटक करण्याची मागणी

सोशल मीडियावर गायक जुबिन नौटियालला अटक करण्याची मागणी

Subscribe

जुबिन नौटियालच्या 23 सप्टेंबर रोजी यूएसमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टचा एक पोस्टर सोशल मीडियीवर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुप्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल ने आपल्या आवाजाने अनेकांना वेड लावले आहे. त्याने आत्तापर्यंत ‘राता लंबियाना’, ‘दिल गलती कर बैठा है’, ‘लुट गए’, ‘तुम ही आना’ यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. जुबिन नौटियाल त्याच्या गाण्यांमुळे वारंवार चर्चेत असतो. दरम्यान, यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याची यूएसमध्ये होणारी कॉन्सर्ट आहे. या कॉन्सर्टमुळे तो सध्या निशाण्यावर आला आहे आणि त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. इतकचं नव्हे तर त्याला अटक केल्याची मागणी देखील केली जात आहे.

जुबिन नौटियालची 23 सप्टेंबर रोजी यूएसमध्ये होणार कॉन्सर्ट

- Advertisement -

जुबिन नौटियालच्या 23 सप्टेंबर रोजी यूएसमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टचा एक पोस्टर सोशल मीडियीवर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मुलाने हा पोस्टर शेअर केला आहे. हा पोस्टर शेअर करत त्या मुलाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझा आवडता गायक हॉस्टन येणार आहे. ग्रेट जॉब जय सिंह, तुझे उत्तम सादरीकरणाची वाट पाहत आहे.” जय सिंह हे नाव पाहताच लोक संतापले आहेत. अनेकांनी जुबिन नौटियालला अटक करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

जय सिंह आहे फरार गुन्हेगार
सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, जय सिंह एक फरार गुन्हेगार आहे. जय सिंहवर व्हिडीओ पायरसी सोबतच इतर अनेक गंभीर आरोप आहेत. पंजाबमधील हा जय सिंह सध्या यूएसमध्ये राहतोय. लोकांच्या मते, जुबिन नौटियाल एका आरोपीच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावणार आहे. त्यामुळे जुबिन नौटियालला नेटकरी ट्रोल करू लागले आहेत. लोकांच्या मते, जुबिन नौटियाल देशद्रोहींसाठी कॉन्सर्ट करत आहे आणि हे देशाच्या विरोधात आहे त्यामुळे त्याला अटक करायला हवी.


हेही वाचा :

‘थँक गॉड’ मध्ये अजय देवगण साकारणार चित्रगुप्ताची भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -