घरट्रेंडिंगSushantsingh Rajput Case: पार्थ पवारांची सीबीआय चौकशीची मागणी!

Sushantsingh Rajput Case: पार्थ पवारांची सीबीआय चौकशीची मागणी!

Subscribe

राज्याचं गृहखातं या प्रकरणातील गांभीर्य व तातडी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेईल,' अशी अपेक्षाही पार्थ यांनी हे निवेदन दिल्यानंतर व्यक्त केली आहे.

दिवसेंदिवस अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करी अशी मागणी जोर धरत आहे. गेले काही दिवस सुशांतचे चाहते सुशांतच्या आत्महत्येमागचं सत्य बाहेर यायला हवं अशी मागणी करत होते. आता राजकीय नेत्यांनी देखील याची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

काय आहे निवेदनात  

सुशांतच्या आत्महत्येमुळे देश हळहळला होता. त्याचं अकाली जाणं म्हणजे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या देशभरातील तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेचा मृत्यू आहे. बिहार, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांतून मला ई-मेल, फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली जात आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी सर्वांची भावना आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. जनभावनेची दखल घेऊन आपण हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडे सोपवावे,’ अशी विनंती पार्थ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र सीबीआयकडे हे प्रकरण गेल्यास ते न्यायोचित ठरेल. राज्याचं गृहखातं या प्रकरणातील गांभीर्य व तातडी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेईल,’ अशी अपेक्षाही पार्थ यांनी हे निवेदन दिल्यानंतर व्यक्त केली आहे.

- Advertisement -

१४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरु आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्याला कुठले नैराश्य होते, त्याला स्वत:च्या जिवाची भीती वाटत होती, आपले करिअर संपणार, मला कोणीतरी मारणार अशी त्याला नेहमीच भीती वाटत होती. त्याला नक्की कोणाची भीती वाटत होती? करिअरच्या सुरुवातीला चांगले चित्रपट मिळत असताना तो अचानक नैराश्यात का गेला? त्याच्या आत्महत्येमागे बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे?  याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे आता बॉलिवूडशी संबंधित प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.


हे ही वाचा – अभिनेत्रीने बाथटब मधला केवळ शर्ट घातलेला फोटो केला शेअर, चाहते म्हणाले…


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -