Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन “कंगनासोबत पुन्हा काम करणार नाही'' डिझाईनर आनंद भूषण यांचे ट्विट व्हायरल

“कंगनासोबत पुन्हा काम करणार नाही” डिझाईनर आनंद भूषण यांचे ट्विट व्हायरल

''हिंसाचाऱ्यांना हिंसाचारातून उत्त द्यायला हवं'' असे धक्कादायक आणि देशयुक्त विधान तिने केल्यामुळे कंगनाचे ट्विटर अकाउंट बॅन केले होते. मात्र यानंतर ही बातमी सर्वतत्र पसरली होती.

Related Story

- Advertisement -

आजच्या बातम्या वाचताना प्रत्येक वाचकाची सुरुवात इतर दिवसांप्रमाणे कंगनच्या आणि तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन झाली. मात्र आज चित्र काहीसे वेगळे होते. नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांची किंवा बेधडक प्रतिक्रियांची मेजवानी खायला मिळत असते. पण आज बॉलिवूडच्या या पंगा गर्लच्या ट्विटर अकाउंटला निलंबित करण्यात आले होते. ”हिंसाचाऱ्यांना हिंसाचारातून उत्त द्यायला हवं” असे धक्कादायक आणि देशयुक्त विधान तिने केल्यामुळे कंगनाचे ट्विटर अकाउंट बॅन केले होते. मात्र यानंतर ही बातमी सर्वतत्र पसरली होती. त्यातील अनेक मेम्सही सकाळपासून व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर फॅशन डिझायनर आनंद भूषण यांनी ही कंगनाने केलेल्या देशयुक्त भाषणावर एक ट्विट केले आहे. आनंद भूषण या ट्विटमध्ये म्हणाले की,” यापूर्वी कंगना रनौन यांच्यासाठी अनेक वेळा डिझाईनचे काम केले होते. मात्र आता मी माझी टिम आमच्या सोशल मीडियावरुन कंगनासोबतच्या सर्व प्रतिमा काढणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यासोबतच भविष्यात पुन्हा तिच्याबरोबर काम करणार नाही आहोत. ”त्यांनी ट्विटरवर अधिकृत घोषणा केली आहे की, तिने आणि तिच्या टिमने सोशल मीडिायवरुन कंगनाच्या यापूर्वी कंगना रनौत यांच्यासाठी अनेक वेळा डिझाइन केले होते. त्यांनी ट्विटरवर अधिकृत घोषणा केली की त्यांनी आणि त्यांच्या टीमने सोशल मीडियावरुन कंगनाच्या सोबतच्या सर्व सहयोगी प्रतिमा काढून टाकण्याचे निश्चित केले आहे. आणि भविष्यात तिच्याबरोबर कधीही काम न करण्याचे वचनही दिले आहे.

 आनंद भूषण यांच्या ट्विटरवरील या पोस्टमुवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. नुकतच कंगनाने बंगलमध्ये झालेल्या विधानसभा निवडनुकीत तृणमूल कॉग्रेसच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारावरुन चार जाणांचे मृत्यू झाले. यावर पंग़ा गर्ल कंगनाने स्वत:च्या ट्विटरवरुन ‘हिंसाचार करणाऱ्यांना हिंसाचारातून उत्तर द्यायला हवं’ असे धक्कादायक विधान केले होते. मात्र हे विधान चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याने ट्विटरने कंगनाचे ट्विटर निलंबित केले. यावर एक व्हिडिओ शेअर करत कंगनाने प्रतिक्रिया केली होती.


- Advertisement -

हे वाचा-  जॅकलीन फर्नांडीसने केली योलो (YOLO) फाउंडेशनची स्थापना, एक लाख लोकांपर्यंत पोहोचवणार जेवण

- Advertisement -