HomeमनोरंजनDeva Movie : शाहिद कपूरच्या देवा सिनेमाचे PVR, INOX मध्ये ॲडवांस बुकिंग...

Deva Movie : शाहिद कपूरच्या देवा सिनेमाचे PVR, INOX मध्ये ॲडवांस बुकिंग सुरू

Subscribe

अभिनेता शाहिद कपूरचा आगामी सिनेमा 'देवा' हा ऍक्शन थ्रिलर ड्रामा आहे. ज्याच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये रिलीजबाबत मोठी उत्सुकता पहायला मिळाली. हा सिनेमा येत्या 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते प्रचंड खुश आहेत. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांवर सिनेमा रिलीज असताना आता थिएटरमध्ये तिकिटांचे ॲडवांस बुकिंग सुरु झाले आहे.

बॉलिवूडचा कबीर सिंग अर्थात अभिनेता शाहिद कपूरचा आगामी सिनेमा ‘देवा’ हा ऍक्शन थ्रिलर ड्रामा आहे. ज्याच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये रिलीजबाबत मोठी उत्सुकता पहायला मिळाली. हा सिनेमा येत्या 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते प्रचंड खुश आहेत. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांवर सिनेमा रिलीज असताना आता थिएटरमध्ये तिकिटांचे ॲडवांस बुकिंग सुरु झाले आहे. याबाबत स्वतः अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Deva Movie Advance Booking Started In PVR And INOX)

शाहिद कपूरची पोस्ट

अभिनेता शाहिद कपूरने अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडीओ ‘देवा’ सिनेमाचा नवा टिझर असून त्याच्या शेवटी ॲडवांस बुकिंग सुरु असे सांगण्यात आले आहे. शिवाय हा व्हिडीओ पोस्ट करताना शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ॲडवांस बुकिंग लिंक बायोमध्ये आहे. देवा सिनेमासाठी 2 दिवस बाकी..’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)


या पोस्टवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स पाहून त्यांची उत्सुकता किती शिगेला पोहोचली आहे हे समजते. सिनेमाचे ॲडवांस बुकिंग PVR आणि INOX या राष्ट्रीय चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे.

शाहिद कपूर साकारतोय पोलिसाची भूमिका

‘देवा’ या ऍक्शन थ्रिलर सिनेमात अभिनेता शाहिद कपूर एका निडर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो न्यायासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवतो. तसेच या सिनेमात अभिनेत्री पूजा हेगडे एका रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवाय पावेल गुलाटीदेखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. कबीर सिंगनंतर शाहिदचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करेल अशी अपेक्षा आहे. सिनेमासाठी सुरु असलेले बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी 7 करोडचा आकडा पार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲक्शन जॉनरमध्ये शाहिदचा कमबॅक

अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या सिनेमानंतर आता पुन्हा एकदा तो जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. शाहिदचा मागील सिनेमा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात शाहिदसोबत क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

यानंतर आता मल्याळम फिल्ममेकर रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित ‘देवा’ला रिलीजआधीच मिळणारा प्रतिसाद पाहता हा सिनेमा या वर्षातील धमाकेदार सिनेमा ठरेल असे चित्र दिसत आहे. या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओज आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी एकत्र येऊन केली आहे.

हेही पहा –

Boney Kapoor : बोनींनी रिक्षासारखं वापरलं हेलिकॉप्टर, फराहने सांगितला भन्नाट किस्सा