लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’ या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडकेदेखील एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. लव फिल्म्सच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यात आता टीझर रिलीजनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. (Devmanus Marathi Movie Teaser Released)
देवमाणूसचा जबरदस्त टीझर
या टीझरमध्ये आपण अभिनेता महेश मांजरेकर यांना कधीही न पाहिलेल्या वारकरीच्या भूमिकेत पाहू शकतो. तसेच रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. लक्ष वेधून घेणारे दृश्य आणि वेगवान साउंड ट्रॅक यांसह ‘देवमाणूस’ चित्रपटाची भव्यता समजून येते. विशेष म्हणजे, देवमाणूसचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये विकी कौशलच्या छावा चित्रपटासह प्रदर्शित केला जाणार आहे. जे या मराठमोळ्या चित्रपटाला अपेक्षित असलेल्या उच्च प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवेल आणि त्याचा लाभ मिळेल’.
टीझर रिलीझच्या उत्साहात, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणाले, ‘देवमाणूस हा माझ्यासाठी अतिशय रोमांचक प्रोजेक्ट आहे. कारण त्याची विलक्षण बांधणी आणि त्यातील पात्रांची सखोलता या प्रतिभावान कलाकारांनी जिवंत केली आहे’.
View this post on Instagram
‘हा चित्रपट बनवण्याचा संपूर्ण प्रवास मनोरंजक आहे आणि या टीझरद्वारे प्रेक्षकांपर्यंत या सिनेमाची एक झलक शेअर करताना मला खूपच आनंद होत आहे. देवमाणूस 25 एप्रिल 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि म्हणूनच मी प्रेक्षकांनी हा सिनेमा अनुभवण्याची आतुरतेने वाट पाहतो आहे’.
हेही पहा –
Deepika Padukone : दीपिकाच्या स्टनिंग लूकवर नेटकरी फिदा, म्हणाले – सो ब्यूटीफुल