Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन देवोलीना भट्टाचार्यने दिशा परमारला विचारली लग्नाची तारीख, दिशा म्हणाली..

देवोलीना भट्टाचार्यने दिशा परमारला विचारली लग्नाची तारीख, दिशा म्हणाली..

दोघांनी काही दिवसांपूर्वी गुपचुप लग्न केल्याच्या चर्चा आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या

Related Story

- Advertisement -

 

बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि त्याची प्रेयसी दिशा परमार यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी गुपचुप लग्न केल्याच्या चर्चा आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. पण काही दिवसातच व्हायरल फोटोचा खुलासा झाला आहे. राहुल आणि दिशाच्या आगामी म्यूजिक व्हिडिओ मधील लग्नाचा चित्रीकरणा दरम्यानचा एक सीन व्हायरल झाला असल्याचे उघडकीस आले. तसेच छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हिने दिशा आणि राहुल साठी केलेलं ट्विट चांगलाच चर्चेचा विषय होत आहे. देवोलीनाने राहुल आणि दिशाला ”तुम्ही कधी लग्न करणार आहात आम्ही तुमच्या लग्नाची वाट पाहत आहोत तो दिवस कधी येणार” असे ट्विट केले आहे.

- Advertisement -

ट्विटचे उत्तर दिशाने अगदी मजेशीर अंदाजात दिले आहे. तिने देवोलीनाच्या ट्विटवर कमेंट करत म्हणाली की ”तुरताच या वेडिंग बेल्स ने काम चालवा” यासोबतच तिच्या आगामी ‘मधानिया’ म्युझिक अल्बमच पोस्टर देवोलीनाला  शेअर केल आहे.

- Advertisement -


दिशा आणि राहुल दोघेही खूप वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. तसेच राहुलने  बिग बॉसच्या घरात दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती. यानंतर दिशाने बिग बॉसच्या शो मध्ये जाऊन राहुलला लग्नासाठी होकार दिला होता. नुकतच राहुल आणि दिशा यादोघांच ‘मधानिया’ म्युजिक अल्बम रिलीज झाले असून अत्तापर्यंत ५ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे.


हे हि वाचा – ‘नॅशनल क्रश’ रश्मिका होणार आता मॅकडॉनल्ड इंडियाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

- Advertisement -