Dhaakad Box Office Collection: कंगना रनौतचा Dhaakad ठरला बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप सिनेमा

dhaakad box office collection day 4 kangana ranaut biggest flop low collection shocking
Dhaakad Box Office Collection: कंगना रनौतचा Dhaakad ठरला बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘धाकड’ चित्रपटाच्या कलेक्शनने सर्वांच्या आशांवर पाणी फेरलं आहे. धाकड चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे झाल्यास या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रिलीजच्या चौथ्याच (Dhaakad day 4 collection) दिवशी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा कमी झालेली दिसली. यामुळे एवढ्या मोठ्या चित्रपटाने कोटींऐवजी रिलीजच्या चौथ्या दिवशी फक्त लाखोंचा गल्ला जमवला. (Dhaakad flop)

कंगना रनौतच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच निराशाजनक सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धाकडने चौथ्या दिवशी केवळ 30 लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.2 कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी चित्रपटाने 1.05 कोटींची कमाई केली. रविवारी ‘धाकड’च्या कलेक्शनमध्ये आणखी घसरण झाली आणि सिनेमाची कमाई 98 लाखांवर गेली. आता चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी चित्रपटाने फक्त 30 लाखांचा गल्ला जमवला आहे.

कंगना रनौतच्या ‘धाकड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

यामुळे पुढील आठवडाभर ‘धाकड’ (Kangana Ranaut films) किती कमाई करतो हे सांगणे कठीण आहे. दरम्यान पुढील एक ते दोन दिवसांत धाकड सिनेमागृहातून आऊट होईल असेही बोलले जात आहे. आतापासून चित्रपटाच्या स्क्रीन्स निम्म्याहून कमी झाल्या आहेत. ‘धाकड’चे शो पूर्ण रिकामी जात आहेत. एवढा मोठा फ्लॉप पाहिल्यानंतर ‘धाकड’च्या थिएटरमधील स्क्रीन झपाट्याने ‘भूल भुलैया २’ साठी शिफ्ट होत आहेत.

धाकड (Dhaakad) या चित्रपटामध्ये कंगनासोबतच अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. कंगनाचा हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.  सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारत आहे.

कंगनाचे बॅक टू बॅक 4 फ्लॉप

कंगना रनौतचा ‘धाकड’ सिनेमा देशातच नाही तर परदेशातही चांगलाच आपटल्याचे सिद्ध झाले. कंगनाची परदेशातील कामगिरी 2022 मधील सर्वात कमी ओपनिंग वीकेंड कमाई ठरली आहे. ओव्हरसीजमध्ये ‘धाकड’ 300 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. जोरदार प्रमोशन कॅम्पेन असूनही कंगनाचा हा चित्रपट चांगली बाजी मारू शकला नाही. त्यामुळे कंगना रनौतचे बॅक टू बॅक चार सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. याआधी पंगा, जजमेंटल है क्या, थलायवी हे चित्रपटात बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाही. यानंतर आता कंगनाचे तेजस आणि सीता हे चित्रपट रिलीजसाठी रांगेत आहेत.


नागराज मंजुळेंच्या ‘झॉलीवूड’चा धमाकेदार ट्रेलर लाँच; चित्रपटातून दिसणार झाडीपट्टीची धमाल