Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'धडक-2' मधून जान्हवी आणि इशानची एक्झिट? करण जोहर म्हणाला...

‘धडक-2’ मधून जान्हवी आणि इशानची एक्झिट? करण जोहर म्हणाला…

Subscribe

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मधील नामांकित निर्माता करण जोहरने गेल्या काही वर्षांपूर्वी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘धडक’ नावाचा सिनेमा प्रदर्शित केला होता. या सिनेमातीन दोन्ही स्टार्सची धमाकेदार एंन्ट्री झाली होती. त्यांना प्रेक्षकांनी ही पसंद केले होते. या सिनेमानंतर जान्हवीला आणखी काही सिनेमात काम करण्याची संधी मिळालीय. आता तिला साउथ सिनेमात काम करण्यासाठी विचारले जात आहे.

परंतु करण जोहर धडक सिनेमाचा सिक्वल तयार करण्याचा प्लॅनिंग करत आहे अशी चर्चा सुरु होती. त्याचसोबत धडकचे लीड स्टार इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांना धडक-२ मधून एक्झिटचा रस्ता दाखवला आहे हे ही बोलले जात होते. तर यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ति डिमरी यांची एंन्ट्री होणार आहे अशी ही चर्चा होती.अशातच आता करणने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने असे म्हटले आहे की, जे लोक धडक-२ बद्दल चर्चा करत आहेत त्यांनी लक्षात घ्यावे की, आम्ही धडकचा सिक्वल करत नाही आहोत. या संदर्भातील काही बातम्या सुद्धा समोर आलेल्या आहेत.

- Advertisement -

करण जोहरचा धडक हा सिनेमा मराठीतील ‘सैराट’ सिनेमाचा रिमेक होता. तर धडक सिनेमाला प्रेक्षकांनी फार पसंद केले होते. परंतु सिनेमा प्रदर्शित करताना करण जोहरवर नेपोटिज्मचे खुप आरोप सुद्धा लागले होते.


- Advertisement -

हेही वाचा: प्रेग्नेंट सना खानला पतीने भर पार्टीतून नेलं ओढून; नेटकऱ्यांचा संताप

- Advertisment -