दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या व तमिळ अभिनेता धनुष कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांचा 18 वर्षांचा संसार मोडला आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांचा घटस्फोट मंजूर झाला आहे. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वीच या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही मुलांना एकत्र वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांचं 2004 मध्ये लग्न झालं असून त्यांना लिंगा आणि यात्रा अशी दोन मुलं आहेत. 17 जानेवारी 2022 मध्ये दोघांनी वेगळं होण्यासाठी 2022 मध्ये अर्ज केला होता, जो आता मंजूर झाला आहे. चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला अधिकृत घटस्फोट मंजूर केला आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी हा कठोर निर्णय घेतला होता. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर, या जोडप्यानं आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
धनुष अभिनेत्री नयनतारासोबतच्या वादामुळे चर्चेत होता. धनुषने आरोप केला आहे की, नयनताराच्या लग्नाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्याच्या 2015 मधील तमिळ चित्रपट ननुम राउडी धानचे फुटेज वापरलं गेलं आहे. यासाठी अभिनेत्रीला परवानगी देण्यात आली नव्हती. चित्रपटाची तीन सेकंदाची बीटीएस क्लिप वापरल्याबद्दल धनुषने अभिनेत्रीकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. तर नयनताराने या मुद्द्यावरून धनुषवर नाराजी व्यक्त केली होती.