Dhanush Aishwarya Seprated : धनुष ऐश्वर्याचा घटस्फोट, विभक्त होण्याचा ट्विटरवर केला खुलासा

धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्षांमध्ये केवळ एकाच चित्रपटात काम केले आहे. Why this kolavari Di असेलल्या थ्री सिनेमात दोघे एकत्र दिसले आहेत. २०१२ मध्ये धनुष आणि श्रुती हसन असलेला थ्री सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण धनुषने गायलेले Why this kolavari Di तुफान लोकप्रिय झाले. एक वेगळ कथानक असलेला हा माझा एकमेव सिनेमा असेल असे धनुषने चित्रपटाच्या आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळेच या दोघांनी पुन्हा कधीच एका सिनेमावर काम केले नसल्याचे इतक्या वर्षात दिसून आले.

Dhanush Aishwarya

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या यांनी १८ वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. एक सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर दोघांनीही ही माहिती दिली आहे. आज आम्ही एका अशा स्थितीत आहोत, जिथे आम्ही आमची वेगवेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी आणि व्यक्तीगत पातळीवर स्वतःला समजून घेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाचा आदर करावा आणि या गोष्टीचा सामना करण्यासाठी आम्हाला प्रायव्हसी नक्की द्या, असेही आवाहन धनुषने केले आहे.

मित्राच्या रूपात, कपलच्या रूपात, आई वडिलांच्या रूपात आणि एकमेकांच्या शुभचिंतकाच्या रूपात आम्ही १८ वर्षे एकत्र राहिले. हा कालावधी सामंजस्य, प्रगती, समायोजन आणि अनुकुलन अशा प्रकारचा राहिला आहे, असेही धनुषने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनुषने अभिनेता रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याशी १८ नोव्हेंबर २००४ रोजी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते. तेव्हा धनुष अवघ्या २३ वर्षांच्या होता. दोघांची पहिली भेट ही २००३ मध्ये एका फिल्मच्या सेटवर झाली होती. धनुष आणि एेश्वर्याला दोन मुले आहेत. या मुलांचे नाव यत्र आणि लिंगा आहे.

ऐश्वर्यानेही आपल्या ट्विटर पोस्टमध्ये फक्त तुमची समज आणि तुमचे प्रेम आवश्यक आहे, अशा आशयाची पोस्ट केली आहे. धनुषने शेअर केलेलीच पोस्ट ऐश्वर्यानेही शेअर केली आहे.

धनुष ऐश्वर्याचा पहिल्या भेटीचा किस्सा

धनुषने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यासोबतच्या आपल्या पहिल्या मुलाखतीचा उल्लेख केला होता. त्यामध्ये धनुषने आपल्या काढाल कोंडेच्या पहिल्या शो चा उल्लेख केला होता. पहिला शो पाहतानाच अंदाज आला होता की हा चित्रपट हिट होणार आहे. जेव्हा चित्रपट संपला तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्याने माझी भेट सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्याशी करून दिली. आम्ही एकमेकांना हाय म्हणालो आणि निघून गेलो. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने एक बुके पाठवला आणि सांगितले की टचमध्ये रहा आणि मी त्या गोष्टीला खूपच सिरीयसली घेतले.

धनुषची इंडस्ट्रीतील कारकीर्द

धनुषने आपल्या करियरची सुरूवात ही २००२ साली केली होती. त्याचा पहिला रिलिज झालेला चित्रपट महणजे थुल्लुवाई इलमाई. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली. त्यानंतर अनेक हिट चित्रपटात धनुषने काम केले. आतापर्यंत धनुषने ५० हून अधिक चित्रपट केले आहेत. धनुषने २०१३ मध्ये रांझणा चित्रपटाच्या निमित्ताने एंट्री केली. नुकतीच धनुषची अतरंगी रे रिलिज झाली आहे. त्यामध्ये सारा अली खान आणि अक्षय कुमारसोबत धनुष दिसला आहे. या चित्रपटातही धनुषच्या कामाचे कौतुक झाले आहे.

दोघांचा १८ वर्षात एकच चित्रपट

धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्षांमध्ये केवळ एकाच चित्रपटात काम केले आहे. Why this kolavari Di असेलल्या थ्री सिनेमात दोघे एकत्र दिसले आहेत. २०१२ मध्ये धनुष आणि श्रुती हसन असलेला थ्री सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण धनुषने गायलेले Why this kolavari Di तुफान लोकप्रिय झाले. एक वेगळ कथानक असलेला हा माझा एकमेव सिनेमा असेल असे धनुषने चित्रपटाच्या आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळेच या दोघांनी पुन्हा कधीच एका सिनेमावर काम केले नसल्याचे इतक्या वर्षात दिसून आले.