घरताज्या घडामोडीसुपरस्टार धनुषच्या Maaranचा ट्रेलर रिलीज, निभावणार पत्रकाराची भूमिका

सुपरस्टार धनुषच्या Maaranचा ट्रेलर रिलीज, निभावणार पत्रकाराची भूमिका

Subscribe

मारन हा ओटीटीवर रिलीज होणारा धनुषचा तिसरा सिनेमा आहे. याआधी जगमे थंडीरम आणि अतरंगी रे हे दोन सिनेमे देखील ओटीटीवरच रिलीज झाले होते.

Maaran : अतरंगी रे नंतर साऊथ सुपरस्टार धनुषचा चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे मारन.  मारन या त्याच्या तमिळ सिनेमाची धनुषचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच मारन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी ट्विट करत सिनेमाचा ट्रेलर शेअर केला. सिनेमात धनुष एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. संध्या ज्योती फिल्म यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या ११ मार्चला रिलीज होणार असून डिस्न्जी प्लस हॉटस्टारवर सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या आधी मकर संक्रांती दिवशी सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. मोशन पोस्टर पाहून सिनेमाची उत्सुकता वाढली होती. अखेर सिनेमाचा ट्रेलर रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मारन सिनेमात अभिनेता धनुषसह अभिनेत्री मालविका मोहनान मुख्य भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे समुथिरकनी, बोस वेंकट, नरेन, इलावारसू आणि रामकी हे कलाकारही मुख्य भूमिकेत असणार आहेत.

- Advertisement -

मारन सिनेमात धनुष प्रसिद्ध पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. ज्यात तो सत्तेत असलेल्या लोकांना सत्य सांगण्यास मागे पुढे पाहत नाही. शक्तिशाली राजकारणाला चिरडून एका घोटाळ्याचा धनुष कसा पर्दाफाश करतो, ही कहाणी सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे सिनेमात मारन म्हणजेच धनुषचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक सीन्स देखील पाहायला मिळणार आहे. धनुषच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री मालविका हिने साकारली आहे. मालविका आणि धनुष यांना एकत्र स्क्रिनवर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर असल्याचे पाहायला मिळत आहे.

मागच्या काही महिन्यात कस्तुरी राजा म्हणजेच धनुषचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. मारन हा ओटीटीवर रिलीज होणारा धनुषचा तिसरा सिनेमा आहे. याआधी जगमे थंडीरम आणि अतरंगी रे हे दोन सिनेमे देखील ओटीटीवरच रिलीज झाले होते.


हेही वाचा – Photo : जब्याच्या शालूचं नवं फोटोशूट, फॅन्स म्हणाले ‘तू मृगनयनी अप्सरा’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -