‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ चित्रपटाला दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड

अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने "धर्मवीर" या चित्रपटाची निर्मिती केली आहे

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला असून, दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आले.

अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने “धर्मवीर” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत.

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. १३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट दमदार कामगिरी करत सुपरहिट ठरला. त्यानंतर आता दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आल्याने चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.


हेही वाचा :अमिताभ बच्चन यांनी घेतलं सायन येथील विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन; फोटो व्हायरल