घरमनोरंजनधर्मेंद्र यांच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून पोट भरण्यासाठी खाल्ला ईसबगोल

धर्मेंद्र यांच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून पोट भरण्यासाठी खाल्ला ईसबगोल

Subscribe

नेहमीप्रमाणे धर्मेंद्र काम मागण्यासाठी निर्मात्यांच्या कार्यालयात वणवण फिरले. अखेर थकून ते घरी आले. हातात काम नव्हते आणि खिशात पैसे नव्हते.

ज्येष्ठ अभिनेते बॉलीवूडचे हिमॅन धर्मेंद्र (Dharmendra admitted breach candy hospital) यांची तब्येत बिघडली असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अफवेने सर्वत्र खळबळ उडालेली असतानाच पापा ठणठणीत असल्याचे धर्मेंद्र यांचे पुत्र बॉबी देऑल यांनी सांगितले आहे. यामुळे धर्मेंद्र यांचे चाहते निश्चिंत झाले असून त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. याचनिमित्ताने धर्मेंद्र यांच्या आयुष्यप्रवासाचे किस्सेही चर्चेत आले आहेत.

उंचपुरा धिप्पाड देह आणि देखणं व्यक्तीमत्व लाभलेले धर्मेंद्र मूळचे पंजाबचे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या धर्मेंद्र यांना लहानपणापासूनच सिनेमात काम करण्याची इच्छा होती. पण कुटुंब शेतकरी असल्याने धर्मेंद्र यांनीही शेती करावी अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. पण धर्मेंद्र यांनी आपल्याला सिनेमात काम करायचयं असं घरातल्यांना ठणकावून सांगितलं त्यामुळे शेवटी त्यांच्या जिद्दी स्वभावापुढे आई वडीलही झुकले आणि त्यांनी धर्मेंद्र यांना स्वतचे नशीब आजमावण्याची संधी शोधण्याचे आव्हान केले.

- Advertisement -

dharmendra rumors

त्यानंतर धर्मेंद्र यांनीही क्षणाचाही विलंब न करता थेट मुंबई गाठली. १९५५-५६ साली ते मुंबई नगरीत आले. सिनेमाता काम मिळवण्यासाठी त्यांना अनेक प्रोड्युसरच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवल्या. पण त्यांना कोणीही काम दिले नाही. पण धर्मेंद्र स्वभावाने हट्टी होते महत्वाकांक्षी होते. ते अनेक ठिकाणी जाऊन ऑडिशन देत होते. सुखवस्तू घरातील असूनही मुंबईला आल्यावर त्यांनी कधीही वडिलांकडून खर्चासाठी पैसे मागितले नाहीत. पंजाबच्या मातीत आखाड्याच्या मातीत वाढलेले धर्मेंद्र नियमित व्यायाम करत पण त्यामुळे त्यांना प्रचंड भूक लागायची. पण हातात कामच नसल्याने त्यांच्याकडे पैसेही नसतं. एका मित्राबरोबर ते भाड्याच्या घरात राहात होते. दिवसभर फिरुनही त्यांना काम मिळत नव्हते. अखेर एक दिवशी अशीच सगळीकडे काम मागण्यासाठी फिरून झाल्यावर ते घरी आले. हातात काम नव्हते आणि खिशात पैसे नव्हते. यामुळे ते उपाशीपोटी झोपले. पण पोटात अन्नाचा कण नव्हता. भुकेचा डोंब उसळली होता. व्यायमाच कसरती शऱीर असलेल्या धर्मेंद्रला भूक असह्य झाली. शेवटी रुमपार्टनर असलेल्या मित्राच्या कपाटात त्यांना ईसबगोलचे पाकीट सापडले. त्यांनी मागचापुढचा विचार न करता पोट भरण्यासाठी पाकिटातले ईसबगोल घेतले.

- Advertisement -

त्यानंतर जे अपेक्षित होते तेच झाले. त्यांना पोटात मुरड मारून वेदना होऊ लागल्या. शेवटी रुमपार्टनर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यांना काय खाल्लस असं विचारले त्यावर पोट भरण्यासाठी ईसबगोल घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते ऐकूण डॉक्टर आणि मित्र दोघेही चक्रावले. नंतर डॉक्टरनेच त्यांच्यासाठी जेवण मागवले. याचदरम्यान प्रोड्युसर् हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना ब्रेक दिला. त्यानंतर धर्मेंद्र यांनी कधीही मागे वळून पाहीले नाही. पुढे धर्मेद्र सुपरस्टार झाले. पण तरीही हिंगोरानींचे उपकार ते कधीही विसरले नाहीत. आपल्या बिझी शेडयूलमध्येही वेळ काढत त्यांनी नाममात्र मानधन घेत हिंगोरानींच्या चित्रपटात काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -