बिग बी यांना ‘अँग्री यंग मॅन’ ओळख देणाऱ्या ‘जंजीर’च्या लिड रोलबाबत धर्मेंद्र म्हणाले…

बिग बी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरला.

Dharmendra said about the lead role of 'Zanjeer' which introduced Big B as 'Agri Young Man' ...
बिग बी यांना 'अॅग्री यंग मॅन' ओळख देणाऱ्या 'जंजीर'च्या लिड रोलबाबत धर्मेंद्र म्हणाले...

सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या अंतर्गत दिग्दर्शित करण्यात आलेला तसेच अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणारा १९७३ सालचा सुपरहिट चित्रपट ‘जंजीर’ हा बिग बी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. याच चित्रपटानंतर त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या चित्रपटानंतर बिग बी यांना अनेक महत्वपूर्ण चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. पण आता बॉलिवूड मधील दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांनी ‘जंजीर’ चित्रपटाबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका मुलखती दरम्यान धर्मेंद्र यांनी ”जंजीर चित्रपट पहिले मला ऑफर करण्यात आला होता आणि चित्रपटाची संपूर्ण तयारी सुद्धा केली होती परंतु काही व्यक्तीगत कारणांमुळे चित्रपट करण्यास होकार देऊ शकलो नाही, जंजीर चित्रपटच नाही तर ‘आनंद’ सारखे अनेक चित्रपट मला सोडावे लागले.” असे वक्तव्य धर्मेंद्र यांनी केले आहे. धर्मेंद्र यांच्या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

धर्मेंद्र देओल हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केल आहे. दोघांनी मिळून हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला होता. ‘शोले’ हा ब्लॉकबस्टर सिनेमाने दोघांची जय आणि विरू म्हणून मैत्रीपूर्ण नात्याची संपूर्ण सिनेमा प्रेमींना ओळख करून दिली आहे.


हे हि वाचा – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रात शूटिंग सुरू ठेवण्यास मागितली परवानगी