बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्बेत अचानक बिघडली असल्याची बातमी मंगळवारी समोर आली होती. उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार धर्मेंद्र यांची प्रकृती उत्तम असून ते कोणताही अमेरिकेमध्ये उपचारासाठी नव्हे तर व्हेकेशनसाठी गेले आहेत. याबाबत स्वतः त्यांनी खुलासा केला आहे.
धर्मेंद्र यांनी अमेरिकेतील नवा व्हिडीओ
धर्मेंद्र उपचारासाठी अमेरिकेत गेले असल्याची बातमी समोर आली होती. ज्यामुळे त्यांचे चाहते चिंता व्यक्त करताना दिसत होते. मात्र, त्यांना काहीही झालेलं नसून ते अमेरिकेत व्हेकेशनसाठी गेले असल्याचं त्यांनी स्वतः पोस्ट शेअर करुन सांगितलं आहे. धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Friends, after long enjoying a small holiday in USA . Will soon be back for my new film. This loving pet is in love with me haha 😆 pic.twitter.com/9vnPSQinwC
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 12, 2023
ज्यामध्ये ते एका कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “मित्रांनो, खूप दिवसांनी यूएसए मध्ये छोट्या सुट्टीचा आनंद लुटला. माझ्या नवीन चित्रपटासाठी लवकरच परतेन. हा गोंडस पाळीव प्राणी माझ्यावर प्रेम करतोय” धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल आणि पत्नी प्रकाश कौर देखील आहे. शिवाय त्यांच्या मुली अजिता आणि विजेता देखील त्यांच्यासोबत फॅमिली टाईम स्पेंड करणार आहेत.
‘या’ चित्रपटामध्ये दिसले होते धर्मेंद्र
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. तसेच सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटात यशाबद्दल देखील त्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला होता.