अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा बहुचर्चित ‘गदर 2’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. प्रेक्षकही चित्रपटाचे प्रचंड कौतुक करत आहेत. अशातच, अभिनेते धर्मेंद्र यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ‘गदर 2’ला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
धर्मेंद्रने मानले आभार
View this post on Instagram
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला देखील त्याकाळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. आता जवळपास 22 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ला देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. हेच प्रेम पाहून धर्मेंद्र यांनी पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये धर्मेंद्र ‘गदर 2’ लाइट बोर्ड आणि काही सुंदर फुलांसोबत पोज देताना दिसत आहेत. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “मित्रांनो, ‘गदर 2’ ला तुम्ही सर्वांनी दिलेला सुंदर प्रतिसाद. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून प्रेम… तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला आहे.” दरम्यान, धर्मेंद्रच्या या पोस्ट अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.
100 कोटींमध्ये तयार झाला चित्रपट
11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांमध्ये 100 कोटींचा टप्पा पार केला आहेत. हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.