घरमनोरंजनघटस्फोटानंतर पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसली ईशा देओल

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसली ईशा देओल

Subscribe

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ईशा देओल हिच्या पर्सनल लाईफमध्ये मोठ्या घडामोडी या बघायला मिळत आहेत. काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसून यांच्यातील वाद हा टोकाला गेलाय. शेवटी ईशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आम्ही सहमताने एकमेकांसोबत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच दिसली विमानतळावर

ईशा देओल ही आता घटस्फोटानंतर पहिल्यांदाच विमानतळावर स्पॉट झाली.व्हाइट रंगाचा टीशर्ट आणि जिन्समध्ये ईशा देओल ही स्पॉट झाली. ईशा देओल हिला पापाराझी यांनी विचारले की, ‘कसे आहात मॅडम? यावर ईशा देओल म्हणाली, मी मस्त आहे तुम्ही लोक कसे आहात’. आता ईशा देओल हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ईशा देओल ही चेहऱ्यावर आपले दु:ख लपवताना दिसत आहे. ईशा देओल हिच्यासाठी नक्कीच भरत याच्यासोबत घटस्फोट घेणे सोपे नव्हते. ईशा देओल आणि भरत यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Snehkumar Zala (@snehzala)

- Advertisement -

ईशा – भरत यांचं संपलं नातं

दिल्ली टाइम्स’नं दिलेल्या रिपोर्टनुसार, ईशा आणि भरतनं एक जॉइन्ट स्टेटमेंट त्यांच्या घटस्फोटाविषयी घोषित केलं. स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलं की ‘आम्ही दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर, आता आम्ही एकत्र नाही. मात्र, आमच्यासाठी आमच्या दोन्ही मुलाचं भविष्य खूप महत्त्वाचं आहे आणि कायम राहिल. आशा आहे की तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल.’
ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरतशी लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणानं पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्यानं राध्या नावाच्या मुलीला जन्म दिला त्यानंतर 2019 मध्ये ईशानं त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत आणि दोघांना दोन मुली आहेत. आता मात्र 11 वर्षानंतर दोघांचा संसार मोडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -