बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्बेत अचानक बिघडली असून उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना झाले आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल देखील अमेरिकेसाठी सोमवारी रवाना झाला आहे. धर्मेंद्र 87 वर्षांचे असून त्यांना काही आरोग्य समस्या असल्याने त्यांच्यावर जवळपास 15-20 दिवस अमेरिकेत उपचार होतील.
View this post on Instagram
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या तब्बेतीची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धर्मेंद्र यांना नेमके काय झाले की, त्यांचा उपचार अमेरिकेत केला जात आहे असे प्रश्न विचारले जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सनी देओल आणि धर्मेंद्र 16 सप्टेंबरला भारतात परतणार असल्याचीही माहिती सनी देओलच्या टीमने दिली आहे.
‘या’ चित्रपटामध्ये दिसले होते धर्मेंद्र
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. तसेच सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटात यशाबद्दल देखील त्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला होता.