पहिला दिवस ‘आनंद’ दिवस – ‘धर्मवीर’

धर्मवीर चित्रपटाची पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटींची कमाई

'Dharmaveer'

प्रविण तरडे यांचं दिग्दर्शन असलेला आणि मंगेश देसाई यांची निर्मिती असलेला. धर्मवीर – मु. पो. ठाणे या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु होती. महाराष्ट्रातील जनता या चित्रपत्राची आतुरतेने वाट पाहत होती. आणि अखेर हा बहुचर्चित चित्रपट काल १३ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. ४०० पेक्षा अधिक चित्रपट गृहांमध्ये १० हजारांहून अधिक स्क्रिन वर हा चित्रपट झळकला आहे. अर्थात हा सिनेमा दिवंगत शिवसेना नेते,माजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि त्याहून अधिक जनतेचे लाडके आनंद दिघे साहेब यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे सिनेमाला दमदार ओपनिंग मिळणार हे अपेक्षित होते. आणि जे अपेक्षित होतं तेच घडलं. धर्मवीर या सिनेमाने सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटींची कमाई केली आहे.

धर्मवीर चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती आणि प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा दिला. या चित्रपटात आनंद दिघेंची मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने हुबेहूब साकारली. या भूमिकेसाठी प्रसादाने बोलण्याची शैली, देहबोली, काही विशिष्ट पद्धतीने भूमिकेचा अभ्यास केला. दिघे साहेबांचा ज्यांना ज्यांना सहवास लाभला त्यांच्याशी बोलून भूमिकेसाठी लागणार अधिक अभ्यास केल. आणि त्याच बरोबर दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी लागणारे डोळे हे मला शूटिंग सुरू होण्यापूर्वी सापडले असं ही प्रसाद ओकने सांगितलं. हे सारं पाहून ‘आनंद दिघे साहेब परत आले’ ही भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली. यामुळेच हा सिनेमा लवकरात लवकर पाहण्याची इच्छा प्रेक्षकांच्या मनात होती. हे सगळं सिनेमाला पहिल्या दिवशी मिळालेल्या ओपनिंगनं सिद्ध केलं.

प्रविण तरडे यांचं अभ्यासपूर्ण दिग्दर्शन आणि त्याच ताकदीने प्रसाद ओकचा अभिनय या मुळे धर्मवीर चित्रपट हा एक परिपूर्ण कलाकृती म्हणून या पुढे देखील नक्कीच ओळखला जाईल धर्मवीर चित्रपटाची यशस्वी घोडदौड अशीच सुरु राहील अशाच अशा पल्लवित झाल्या आहेत. धर्मवीर चित्रपट आत्ता कोणते नवे रेकॉर्ड तोडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

त्याच प्रमाणे धर्मवीर चित्रपटातील शेवटचा सिन हा सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतोय. ज्यात राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या मधला संवाद दाखवण्यात आलाय, ज्यात आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात कि ‘हिंदुत्वाची धुरा आटा तुझ्याच खान्द्यावर आहे’ दरम्यान या सिनचा चा फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेहमीच आपुलकीने आणि उत्तम पद्धतीने संवाद होत असे. आणि त्यामुळेच चित्रपटातील हे दृश्य भावुक क्षणांची आठवण करून देणारे आहेत.

 

काल १३ मे रोजी धर्मवीर हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल २ कोटींची कमाई केली. दरम्यान आनंद दिघे यांची मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता प्रसाद ओक याने सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट या चित्रपटाच्या निमित्ताने केलीय त्यात ‘व्यक्तिमत्वच बलाढ्य आहे तर एन्ट्री साधी कशी असेल…’ असा आशय आहे. धर्मवीर चित्रपटासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ४०० पेक्षा अधिक स्क्रिन आणि १०, ००० पेक्षा जास्त शोचा नवा विक्रम रचला आहे असा आशय आहे.
धर्मवीर मु. पो. ठाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर कोणते नवे विक्रम मोडणार हे पाहणं महत्वाचं. आणि प्रेक्षक सुद्धा या चित्रपटावर अधिकाधिक प्रेम करतील.

 

 


हेही वाचा : “संभाजीला समजून घेण्यासाठी काळीज शिवाजीचं करावं लागेल”, ‘सरसेनापती हंबीरराव’ ट्रेलर रिलीज