‘सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार’, क्षितीज पटवर्धन भडकला!

मुंबईत अनेक भागांमध्ये सकाळपासूनच तळीरामांनी दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर रांग लावली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केल्याचं चित्र दिसून येत होतं.

सोमवारपासून देशात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. कोरोनाचा वाढता प्रर्दुभाव बघता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. केवळ केटेंमेंट झोन वगळता ग्रीन,रेड, ऑरेंज झोनमध्ये दारू विकण्यास पगवानगी देण्यात आली. दारूची दुकानं उघडणार म्हणून लांबच लांब रांगा लावण्यात आल्या. दुकान उघडण्याआधीच तळीरामांनी रांगा लावायला सुरूवात केली. यावेळी तळीरामांना सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडला. याबाबत ‘धुरळा’चा लेखक क्षितिज पटवर्धन याने सोशल मीडियावर त्याचं परखड मत मांडलंय.

‘व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर,’ अशी पोस्ट क्षितिजने फेसबुकवर लिहिली आहे.

मुंबईत अनेक भागांमध्ये सकाळपासूनच तळीरामांनी दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर रांग लावली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केल्याचं चित्र दिसून येत होतं. माटुंगा पश्चिममध्ये तर स्टेशनपासून थेट रुपारेल कॉलेजपर्यंत ही रांग केल्याचं चित्र दिसून आलं. राजधानी दिल्लीमध्ये दारूच्या खरेदीसाठी तळीरामांनी सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर ही रांग एक किलोमीटरपर्यंत लांब होती!


हे ही वाचा – ‘या’ शहरात वाईन शॉप बंदच; तळीरामांची निराशा