Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन DID फेम बिकी दासचा रस्ते अपघात,लॉकडाउनमुळे बिकट परिस्थिती ओढवली

DID फेम बिकी दासचा रस्ते अपघात,लॉकडाउनमुळे बिकट परिस्थिती ओढवली

बिकी दास जोधपुर पार्क येथून रानीकुथी येथे जात होता तेव्हा त्याच्या सोबत अचानक दुर्घटना घडली. बिकीच्या पत्नीने संगीता हिने 5 जून रोजी पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल केला आहे.

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध डांस रियालिटी शो ‘डांस इंडिया डांस 4’ (Dance India Dance 4)मधील स्पर्धक बिकी दास (Biki Das) याचा रस्त्यावर अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे . शुक्रवारी रात्री गंभीर स्थितीत त्याला रुग्णालयात भरती करावे लागले. बिकीने डीआयडी शो मधील चौथ्या सीझनमध्ये भाग घेतला होता. कोरोना व्हायरस काळात त्याला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. पोटा-पाण्याकरिता त्याने फूड डिलिवरी बॉय (Food Delivery Boy) म्हणून कामकरण्यास सुरुवात केली.माहितीनुसार शुक्रवारी 4 जूनच्या रात्री त्याची एका बाईक सोबत टक्कर झाली. बिकी कोलकाता येथे असून आर्थिक तंगीमुळे त्याला गरजेपोटी डिलिवरी बॉय म्हणून काम करावे लागत आहे. एका ग्राहकाकडे जेवणाची ऑर्डर घेऊन जात असताना त्याच्या सोबत दुर्घटना घडली असल्याचे बोलण्यात येत आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची हड्डी फॅक्चर झाली आहे तसेच त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्याचे डॉक्टरांनी संगितले. तसेच सध्या बिकीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

- Advertisement -

बिकी दास जोधपुर पार्क येथून रानीकुथी येथे जात होता तेव्हा त्याच्या सोबत अचानक दुर्घटना घडली. बिकीच्या पत्नीने संगीता हिने 5 जून रोजी पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल केला आहे. सध्या पोलिस या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहे.

2014 मध्ये बिकीने ‘डांस इंडिया डांस’ मध्ये सहभाग घेतला होता. तसेच बिकी शो मध्ये सेकेंड रनर-अप पर्यत्न मजल मारली होती. ‘सुपर डांसर’ शो मध्ये देखील डांस मेंटॉर म्हणून दिसला होता. लॉकडाउन मुले बिकीवर आर्थिक परीस्थिती खालवल्यामुळे त्याला बिकट स्थिती च सामना करावा लागला होता.


- Advertisement -

हे हि वाचा – ‘नागिन३’ फेम पर्ल वी पुरीला जामीन मंजूर, पोस्को अंतर्गत करण्यात आली होती अटक

- Advertisement -