घरमनोरंजनसारा फोनवर कार्तिकशी बोलते?

सारा फोनवर कार्तिकशी बोलते?

Subscribe

अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन अनेकदा एकत्र दिसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये केवळ मैत्री नसून त्यांचे नाते त्यांनी जगजाहीर करावे, असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका चॅट शो दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यनसह डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्यापासूनच बॉलिवूडच्या या जोडीबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसते. साराने मात्र कार्तिकसोबत केवळ घट्ट मैत्री असल्याचेच म्हटले आहे.

नुकताच सारा खानचा एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा फोनवर बोलत असून तिच्या चेहऱ्यावर हलके हसू आहे. त्यामुळे ती फोनवर नक्कीच कार्तिकशी बोलत असणार असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे आता साराने कार्तिक सोबतचे नाते जाहीर करण्याविषयी नेटकरी साराला सांगत आहेत.

- Advertisement -

अनन्याचे कार्तिकवर क्रश

दरम्यान स्टुडण्ट ऑफ द इयर २ मधील अभिनेत्री अनन्या पांडेसोबतही कार्तिकच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली. यावेळी अनन्या पांडेला एका मनोरंजन संकेतस्थळातर्फे लव्ह ट्रॅंगलविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी अनन्याने कार्तिकविषयीच्या नात्याबाबत खुलासा करत चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण वगैरे गोष्टी ठिक वाटतात, असे उत्तर देत मी केवळ २० वर्षांची आहे. त्यामुळे या वयात कोणाचे क्रश असणे साहजिक आहे. आणि ते बदलतही राहील, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री अनन्या पांडे हिने दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -