Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'पठाण'च्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचा आदेश डावलला? बेशरम गाण्यात कोणताही बदल नाही

‘पठाण’च्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचा आदेश डावलला? बेशरम गाण्यात कोणताही बदल नाही

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ आज संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला होणार विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. खरंतर, हा वाद बेशरम रंग गाण्यातील दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकनीमुळे सुरु झाला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या आदेशामुळे चित्रपटात तसेच बेशरम रंग गाण्यात बदल झाल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात कोणताच बदल करण्यात आलेला नाही तसेच बेशरम रंग गाणं देखील पूर्वी सारखंच दाखवण्यात आलं आहे.

सेन्सॉर बोर्डाचा आदेश डावलला?

- Advertisement -

Pathaan' controversy: Censor board suggests changes to Shah Rukh Khan-Deepika Padukone's film, songs - BusinessTodayमहिन्याभरापूर्वी पठाणमधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झालं मात्र, त्यानंतर या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकनीमुळे सुरु झाला होता. देशभरातील हिंदू संघटनांकडून चित्रपटाला विरोध सुरु झाला अनेक राजकीय पक्षांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून पठाण चित्रपटात बदल करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यावेळी चित्रपटात बदल करण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात काही सूक्ष्म बदल केले असून बेशरम रंग गाण्यात कोणताही बदल केला नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कदाचित हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘बेशरम रंग’गाण्याला झाला विरोध

- Advertisement -

Besharam Rang Song | Pathaan | Shah Rukh Khan, Deepika Padukone - Bollywood Hungama
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

‘या’ राज्यांमध्ये देखील झाला विरोध
इंदूर, सुरत, गुवाहाटी आणि आग्र्यामध्ये देखील चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध करण्यात आला. परंतु तरीही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात चित्रपट पाहण्याला पसंती देत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.


हेही वाचा :

इंदूरमध्ये ‘पठाण’ला विरोध; फर्स्ट डे फर्स्ट शो करावा लागला रद्द

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -