‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरूख खानचा ड्युप्लीकेट पाहिलात का?

या चित्रपटात शाहरूखने दिल्लीतील एक वैज्ञानिक आणि वानर अस्त्र ही भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये शाहरूखची भूमिका थोड्या वेळाची आहे.

सध्या बॉलिवूडमधील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचाही सहभाग आहे. ब्रह्मास्त्रमध्ये शाहरूख खानची भूमिका पाहून त्याचे चाहते सुद्धा खूप खूश झाले आहेत. या चित्रपटात शाहरूखने दिल्लीतील एक वैज्ञानिक आणि वानर अस्त्र ही भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये शाहरूखची भूमिका थोड्या वेळाची आहे. परंतु त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. दरम्यान, आता या चित्रपटाच्या सेटवरील एक जुना फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरूख त्याचा स्टंट करणाऱ्या स्टंटमॅनसोबत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hasit Savani (@hasitsavani)

शाहरूख खानसोबतचा हा फोटो त्या स्टंटमॅनने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या स्टंटमॅनचे नाव हसीत सवानी असून तो यूकेमध्ये राहणारा इंटरनॅशनल स्टंट परफॉर्मर आहे. या फोटोमध्ये शाहरूख आणि हसीतच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर लाल रंग लागलेला दिसत आहे. या फोटोखाली हसीतने कॅप्शन लिहिलंय की, ब्रह्मास्त्र मध्ये शाहरूख खानसोबत त्यांचा स्टंट डबल करताना खूप मजा आली. हे माझं भाग्य आहे.

शाहरूख खानचा ड्युप्लीकेट 

खरंतर ब्रह्मास्त्रमध्ये शाहरूख वानर अस्त्र ही भूमिका साकारणार आहे. यावेळी इकडे-तिकडे मोठ-मोठ्या उड्या मारणारा शाहरूख नसून ते स्टंट स्टंटमॅन हसीत करत आहे. स्टंटमॅन हसीतने आत्तापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटामध्ये स्टंट केले आहेत.

शाहरूख खानचे आगामी चित्रपट
शाहरूख खान आगामी काळात त्याच्या पठाण चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दीपिका आणि जॉन अब्राहम देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. या व्यतिरिक्त शाहरूख डंकी चित्रपटामध्ये सुद्धा झळकणार आहे.


हेही वाचा :

‘ब्लेस यू’ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर