घरताज्या घडामोडीकोरोनाच्या काळात बेरोजगार झाला 'हा' लोकप्रिय गायक!

कोरोनाच्या काळात बेरोजगार झाला ‘हा’ लोकप्रिय गायक!

Subscribe

कोरोना काळ सुरू झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. अनेक लोकं बेरोजगार झाले. यामध्ये फक्त सामान्य लोकं नसून सेलिब्रिटांचा देखील समावेश आहे. दरम्यान बॉलिवूड आणि पंजाबी लोकप्रिय गायक मिका सिंह कोरोनाच्या काळात बेरोजगार झाल्याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. मिका सिंह म्हणाला की, ‘माझ्यासारखे अनेक लोकं गेल्या काही महिन्यांपासून घरात बसून आहेत. मला मागील आठ महिन्यांपासून कोणतही काम मिळालेले नाही आणि माझ्यासारखे असे अनेक लोकं आहेत, हे मला माहित आहे. लोकांना बऱ्याच काळापासून चित्रपटगृहात सिनेमे पाहायला मिळाले नाही आहेत. त्यामुळे आता सिनेमा चित्रपटगृहात पाहायला जाण्याचीही अचूक वेळ आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

आगामी चित्रपट ‘सयोनी’साठी ‘एक पप्पी’ गाणे मिका सिंहने गायले आहे. त्यामुळे सध्या मिका सिंह त्याने गायलेले हे गाणे मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. मिका सिंह पुढे म्हणाला की, ‘या चित्रपटात मी ‘एक पप्पी’ गाणे गायले आहे. हे गाणे नवे संगीतकार अनंत आणि अमन यांनी लिहिले आहे. जेव्हा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला हे गाणे गाण्यासाठी संपर्क केला, तेव्हा सुरुवातीला मला हे गाणे जास्त आवडले नाही. परंतु जेव्हा हे गाणे तीन-चार वेळा गुणगुणलो, तेव्हा मला हे गाणे खूप मजेशीर वाटले. या गाण्यात काही डबल मीनिंगचे शब्द आहेत. या गाण्याचे चित्रिकरण खूप चांगले झाले आहे.’

- Advertisement -

‘सयोनी’ या चित्रपटात तन्मय सिंह, मुसकान सेठी, राहुल रॉय, योगराज सिंह, उपासना सिंह मुख्य भूमिकेत आहेत. नितिन कुमार गुप्ता आणि अभय सिंघल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


हेही वाचा – अरबाज खान प्रॉडक्शनचा हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबेला NCBकडून अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -