Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मराठी मालिकांमध्ये साजरे होणार आगळीवेगळे रक्षाबंधन

मराठी मालिकांमध्ये साजरे होणार आगळीवेगळे रक्षाबंधन

Subscribe

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या मालिकांमधून नेहमी काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न करते. मालिकांचे विविध विषय असोत वा व्यक्तिरेखेची नवी एन्ट्री, हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आत्ता ज्या मालिका सुरू आहेत त्यांत नेहमीच्याच उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता मालिकांत वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन प्रसंग साजरे केले जाणार आहेत. ‘तुजं माज सपान’ मालिकेत पैलवान प्राजक्ता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी पुन्हा आपल्या घरी जाणार आहे, तर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत मयूरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयूरीलाच राखी बांधताना पाहायला मिळणार आहे.

मयूरी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करते आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेते आहे; त्यासाठी चक्क भाऊसाहेबच मयूरीला राखी बांधून एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करणार आहेत.’राणी मी होणार’ या मालिकेतही वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या मीरासाठी तिची बहीण मेघ थेट सलूनमध्ये राखी घेऊन पोहोचते. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी झटणाऱ्या मीराला ती राखी बांधणार आहे आणि या बहिणींमधले प्रेम यातून दिसून येणार आहे.

- Advertisement -

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतही रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. एवढ्या वर्षांनी आपला भाऊ आरव आणि बहीण इरा यांना भेटल्यावर बयोला आनंद झाला आहे. रक्षाबंधन असल्यामुळे बयो आरवसाठी राखी घेऊन जाते. आता त्यांचे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे होईल, हे मालिकेत पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे रक्षाबंधनाचे आगळेवेगळे प्रसंग या मालिकांतून पाहायला मिळणार आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

तावडे बहिणींचं अनोखं रक्षाबंधन !!

- Advertisment -