घरमनोरंजन'डीजीफ्लिक्स' ओटीटीवर 'गीशा'चा अनोखा प्रवास

‘डीजीफ्लिक्स’ ओटीटीवर ‘गीशा’चा अनोखा प्रवास

Subscribe

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता नवनवीन कथेवर आधारित वेबसिरिज प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूड चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यास ओटीटी प्लॅटफॉर्म अधिक यशस्वी होत आहे. त्यात आता ‘डीजीफ्लिक्स’ या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध अभिनेते अमन वर्मा, तरुण खन्ना आणि मालवी मल्होत्रा यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणारी ‘गीशा’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच डीजीफ्लिक्सने ‘गीशा’ या वेबसिरीजनिमित्त मालाड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास उलघडणार आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत एका छोटया खेडयातून मुंबईपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. मुंबईसारख्या सेलिब्रिटींच्या झगमगत्या दुनियेत सुपरस्टार अभिनेत्री होण्याचे पूर्ण झालेले गीशाचे स्वप्न. परंतु हे स्वप्न पूर्ण करताना अभिनेत्रीला आलेल्या अनेक अडचणी. तसेच अभिनेत्रीचे प्रेमसंबंध आणि नंतर घडणारी मर्डरमिस्ट्री असा कथेतील ट्विटस्ट या वेबसिरीजमधून पाहता येणार आहे.

सॉफ्ट फोकस निर्मित ‘गीशा’ या वेबसिरीजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमन वर्मा, तरुण खन्ना, अभिनेत्री मालवी मल्होत्रा आणि सहकलाकार विक्रम द्विवेदी अशी स्टारकास्ट झळकणार आहे. तर हमीर जोशी व कुणाल लाखे यांच्या सॉफ्ट फोकस निर्मिती या वेबसिरीजची निर्मिती करत आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेते अमन वर्मा एका प्रसिद्ध बिजनेसमनच्या भूमिकेत झळकणार असून या भूमिकेला वेगवेगळे कंगोरे देण्यात आले आहेत. तर अभिनेत्री मालवी मल्होत्रा एका स्ट्रगलिंग अॅक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेचेही वेगवेगळे पैलू या वेबसिरीजमध्ये पाहता येणार आहे.

- Advertisement -

या भूमिकेविषयी बोलताना अभिनेते अमन वर्मा सांगतात, या वेबसिरीजमध्ये मी एका बिजनेसमनची भूमिका निभावत आहे. बिजनेसमन ही माझी भूमिका कथेला नव्या वळणावर घेऊन जाते आणि नंतर अभिनेत्रीचे आयुष्यातील प्रेमसंबंध आणि तिचे करियर यातील अडचणी अशी एकंदरीत रोमेंटिक पण रिअल लाईफबेस ही वेबसिरीज आहे. त्यामुळे प्रेक्षक गीशा या वेबसिरीजा कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे येणाऱ्या दिवसात पाहूच. या वेबसिरीजमधील चॅलेंजिंग पार्ट म्हणजे वयाने मोठा असलेला बिजनेसमॅन वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो आणि कथा खुलत जाते. तर अमन वर्मांसह लीड रेलमध्ये असलेली मालवी सांगते, मी एका स्ट्रग्लिंग अॅक्टरची भूमिका प्ले करत आहे. परंतु या भुमिकेतून अभिनेत्रीच्या वेगवेगळ्या अडचणी, पैलू यातून दर्शविल्या जाणार आहेत.

या वेबसिरिजमधील सहकलाकार तरुण खन्ना सांगतात, ही वेबसिरीज एका मनोरंजन करणाऱ्या बाईच्या आयुष्याभोवती फिरणारी आहे. परंतु या सिरीजच्या ‘गीशा’ या शीर्षकाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘गीशा’ हा जपानी शब्द आहे. ‘गीशा’ ही अशी महिला जी परिस्थितीसाठी गीशा बनते. तिला गीशा बनण्यासाठी समाजातील परिस्थिती कारणीभूत ठरते. यात मी पोलीस अधिकारी राजवीर शेखावत यांची भूमिका निभावत आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -