घरताज्या घडामोडीDil Bechara फेम अभिनेत्रीवर अमेरिकन फ्लाइटमध्ये गैरवर्तन

Dil Bechara फेम अभिनेत्रीवर अमेरिकन फ्लाइटमध्ये गैरवर्तन

Subscribe

संजनाने एक पोस्ट शेअर करत  अमेरिकरन एअरलाइन्स विरोधात राग व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणूकीबाबत तिची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री संजना सांघी सध्या चर्चेत आली आहे. संजनासोबत अमेरिकन फ्लाइटमध्ये गैरवर्तन झाल्याचा आरोप तिने केला आहे. या संदर्भात तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. झालेल्या प्रकाराचा संजनाला फार राग आला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिचा राग व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे तिच्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे.

संजना सांघी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच संजनाने एक पोस्ट शेअर करत  अमेरिकरन एअरलाइन्स विरोधात राग व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणूकीबाबत तिची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

संजना सांघीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय, नुकतीच मी दिल्लीहून JKF ( जॉन एफ केनेडी इंटरनॅशनल एअरपोर्ट, न्यूयॉर्क ) अमेरिकन एअरलाइन्सला गेले होते. तिथे प्रवासा दरम्यान एअरलाइन्समधील एका क्रू मेंबरने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्या क्रू मेंबरने माझी माफी मागावी अशी मागणी आहे आणि आशा करते की भविष्यात इतर कोणत्या प्रवाशाला अशाप्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागणार नाही.

संजनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. असे म्हटले जात आहे की, संजना ही बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री जिच्यासोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन करण्यात आले आहे.  संजना सांघीच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर, २४ जुलै २०२०मध्ये दिल बेचारा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा सिनेमा ठरला होता. ज्यात संजना सांघीने त्याच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती.


हेही वाचा – Hijab Controversy : ‘हिजाब मुस्लिम महिलांसाठी चॉइस नाही जबाबदारी’ दंगल फेम अभिनेत्री Zaira Wasim चं वक्तव्य

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -