घरमनोरंजनमरना कब है हम डिसाईड नही करते..., सुशांतच्या 'दिल बेचारा' चा Trailer...

मरना कब है हम डिसाईड नही करते…, सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चा Trailer Out!

Subscribe

सुबॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा अखेरचा ठरलेला दिल बेचारा चित्रपटाचे ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले आहे. सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केली होती. वयाच्या ३४ व्या वर्षी एका कलाकाराने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे बॉलीवूडसह संपूर्ण देशातून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या दिल बेचारा या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. तसेच त्याच्या निधनानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली होती. अखेर दिल बेचाराचा ट्रेलर आज, ६ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून हा २४ जुलै रोजी हा डिस्नी हॉटस्टार या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री संजना संघी हिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत असणाऱ्या दिल बेचारा चित्रपटातील लेजन्ट ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभले आहे. मुकेश छाबरा यांनी चित्रपटाने दिग्दर्शन केले असून सुशांतच्या निधनामुळे हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असून सुशांतच्या चाहत्यांनी मात्र हा थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याची मागणी यापूर्वी केली आहे. कर्करोग झालेल्या मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीला जगण्याची उमेद देणाऱ्या प्रियकराची भूमिका या चित्रपटात सुशांतने साकारली आहे. मरना कब है ये हम डिसाईड नही करते, पर जीना कैसे है ये हम डिसाईड कर सकते है…, हे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला लावणारे संवाद सुशांतने या चित्रपटात म्हटले आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात त्याला याचा अवलंब करता आला नाही, असेच त्याच्या आत्महत्येच्या घटनेवरून दिसून येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -