घरमनोरंजन'दिल बेधुंद' 19 मे रोजी होणार प्रदर्शित

‘दिल बेधुंद’ 19 मे रोजी होणार प्रदर्शित

Subscribe

‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास ३’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारा मलेरिया दादुस अर्थात अभिनेता जयेश चव्हाण आता ‘दिल बेधुंद’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात तो रामण्णा हे साऊथ इंडियन पात्र साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी जयेश म्हणाला, ‘रामण्णा हा राजचा (हंसराज जगताप) जिगरी दोस्त आहे. राजचे पान रामण्णाशिवाय हलत नाही. राज कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असला तर त्यावर रामण्णाकडे १०१ उपाय असतात. पण त्याच उपायामुळे राजच्या आयुष्यात काय गमतीजमती घडतात हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.

मलेरिया या पात्राने जशी धम्माल उडवली त्याहून अधिक धम्माल रामण्णा उडवून देईल असा मला विश्वास आहे.’ टाईमपास चित्रपटात जयेशने आपल्या आगरी बोलीभाषा बोलताना दिसला होता, या चित्रपटात तो साऊथ इंडियन लहेजात बोलताना दिसेल. त्यासाठी त्याने ‘चंगू मंगू’ या मराठी चित्रपटातील अशोक सराफ यांच्या पात्राचा संदर्भ घेतला आहे.
हंसराज जगताप आणि साक्षी चौधरी यांची केमिस्ट्री चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

या दोघांसमवेत जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. दिल बेधुंद हा चित्रपट 19 मे रोजी महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ओशियन कर्व्हज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवम पाटील आहेत. संतोष फुंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून गुड्डू देवांगन यांनी कथा लिहिली आहे.


हेही वाचा :

अदा शर्माचा अपघात; ट्वीट शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -